उत्तर महाराष्ट्र

जळगाव जिल्ह्यातून 12 हजार टन केळी निर्यात 

प्रदीप वैद्य

रावेर - जिल्ह्यातील निर्यात होणारे, शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणजे केळी आहे. या वर्षी जिल्ह्यातील सुमारे सहाशे कंटेनर म्हणजे 15 कोटी रुपयांची बारा हजार टन केळी निर्यात झाली आहे. आगामी काळात ही निर्यात वाढणार आहे. निर्यातीत रावेर तालुक्‍याचा वाटा 70 टक्के आहे. 

मागील पाच-सात वर्षांपासून खानदेशी केळीला पाकिस्तानात चांगली बाजारपेठ मिळाली आहे. गेल्या दोन- तीन वर्षांत अरब राष्ट्रांत जिल्ह्यातील केळी निर्यात होत आहे. इराक, इराण, दुबई, अफगाणिस्तान आदी देशांत ही निर्यात समुद्रमार्गे होत आहे. केळी निर्यात दिवाळीनंतर सुरू होते ती जूनअखेरपर्यंत चालते. ऑक्‍टोबर 2017 ते जून 2018 याकाळात जिल्ह्यातून सुमारे 12 ते 15 निर्यातदार कंपन्यांनी 600 कंटेनर केळी निर्यात केली. रावेर तालुक्‍यातील तांदलवाडी, ऐनपूर, निंबोल, विटवा, केऱ्हाळे, अजनाड, अटवाडे, चोरवड, नेहता, दोधा, निरुळ, खानापूर या तापी पट्ट्यातील व दक्षिण पूर्व भागातील शेतकऱ्यांचा वाटा मोठा आहे. 

एका कंटेनरमध्ये 200 क्विंटल म्हणजे 20 टन केळी निर्यात होते. कंटेनर वातानुकूलित असतात. केळीची काळजीपूर्वक हाताळणी करून बॉक्‍समध्ये केळी भरून निर्यात होते. जिल्ह्यात निर्यातक्षम केळी उत्पादन वाढत आहे. आगामी वर्षात ही निर्यात एक हजार कंटेनरपर्यंत नेण्याचा निर्धार युवा शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

युवक शेतकऱ्यांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. निर्यातक्षम, दर्जेदार केळी उत्पादन करण्याचे ध्येय गाठण्यासाठी केळी तज्ज्ञ के. बी. पाटील यांचे मार्गदर्शन मिळते. या वर्षी तालुक्‍याच्या दक्षिण पूर्व भागातील एक हजार टन केळी निर्यात झाली अशीच अनुकूल परिस्थिती राहिली तर या भागातून किमान पाच हजार टन केळी निर्यात करू. 
-विशाल अग्रवाल,  केळी उत्पादक शेतकरी, अटवाडा, ता. रावेर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT