Electricity Bill Payment esakal
उत्तर महाराष्ट्र

Electricity Bill : बिल वेळेत न भरणाऱ्या 14 लाख ग्राहकांना भरावा लागला दंडाचा भुर्दंड; राज्यातील चित्र!

सकाळ वृत्तसेवा

Electricity Bill : राज्यामध्ये चालू आर्थिक वर्षात दरमहा सरासरी १२ लाख घरगुती वीजग्राहकांनी वीजबिल तर भरले पण बिल भरण्याची मुदत न पाळल्यामुळे त्यांना दंड भरावा लागला.

वीजग्राहकांनी वेळेत बिल भरून दंड टाळावा, तसेच वेळेपूर्वी आणि ऑनलाइन बिल भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीजग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमुख सेवा देण्याची सूचना केली आहे. (14 lakh customers did not pay bill on time had to pay penalty nandurbar news)

त्यानुसार ग्राहकांना वीजबिलातील सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे.

लोकेश चंद्र म्हणाले, की चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२३ नंतर महावितरणचे विविध वर्गवारीतील दरमहा सरासरी एकूण १३ लाख ८९ हजार असे ग्राहक आढळले आहेत, की ज्यांनी नियमितपणे वीजबिले भरली पण बिल भरण्याच्या देय तारखेनंतर बिल भरल्याने त्यांना सव्वा टक्का दंड द्यावा लागला. यामध्ये १२ लाख ३१ हजार घरगुती ग्राहक आहेत. व्यावसायिक ग्राहकांची संख्या एक लाख ३३ हजार आहे, तर औद्योगिक ग्राहकांची संख्या १७ हजार आहे.

महावितरणच्या वीजबिलावर मुदतीचा स्पष्ट उल्लेख असतो. बिल अथवा देयक तारखेपासून २१ दिवसांत बिल भरायचे असते. त्याची स्पष्ट मुदत देय तारीख नावाने दिलेली असते. त्यानंतर बिल भरले तर सव्वा टक्का दंड द्यावा लागतो. हा दंड टाळण्यासाठी देय तारखेपर्यंतच बिल भरावे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महावितरणच्या ग्राहकांनी तत्पर बिल भरणा, ऑनलाइन पेमेंट व गो ग्रीनची सुविधा वापरली तर त्यांना वीजबिलात मोठी सवलत मिळते. वीजग्राहकांनी मुदतीपूर्वी वीजबिलाचा भरणा केला तर त्यांना प्रॉम्प्ट पेमेंटसाठी अर्थात तत्पर बिल भरणा केल्याबद्दल एक टक्का सवलत मिळते.

हे बिल भीम ॲप, गुगल पे, पेटीएम किंवा बँकेच्या ॲपवरून किंवा महावितरणच्या वेबसाइटवरून किंवा महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन पद्धतीने भरले तर पाव टक्का सवलत मिळते. याखेरीज ग्राहकांनी छापील कागदी बिलाऐवजी ईमेलने बिल स्वीकारण्याचा गो ग्रीनचा पर्यावरणपूरक पर्याय निवडला तर प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळते.

सध्या महावितरणचे ६० टक्के ग्राहक ऑनलाइन बिल भरतात. विजेची बिले ऑनलाइन भरणे आणि ती दिलेल्या मुदतीच्या आधी भरणे हे वीजग्राहकांना सहज शक्य आहे. त्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाचतात आणि बिलात सवलत मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT