crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : 2 लाखांचे 15 मोबाईल जप्त; ‘एलसीबी’ची कारवाई

‘एलसीबी’च्या पथकाने दोन लाखांचे महागडे १५ मोबाईल चोरट्याकडून हस्तगत केले. त्याला अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : येथील ‘एलसीबी’च्या पथकाने दोन लाखांचे महागडे १५ मोबाईल चोरट्याकडून हस्तगत केले. त्याला अटक केली आहे.

शहरातील अंबिकानगरातील मोहम्मद कमरुद्दीन मोहम्मद अजीजउल्ला कुरेशी यांच्या घरातून १३ हजारांचा मोबाईल चोरीस गेला. ही घटना २५ डिसेंबरला सायंकाळी घडली. (15 mobile phones worth 2 lakh seized from accused Action of LCB dhule crime news )

या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शहरात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांनी मोबाईल चोरीच्या सखोल तपासाची सूचना एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना दिली.

या पार्श्वभूमीवर श्री. शिंदे यांनी विशेष मोहिमेतून कबीर युसूफ काझी (रा. चाळीसगाव रोड, गजानन कॉलनी, धुळे) याला अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल व इतर १५ मोबाईल जप्त केले.

श्री. शिंदे, सहाय्यक अधिकारी प्रकाश पाटील, श्‍याम निकम, हवालदार सुरेश भालेराव, पंकज खैरमोडे, रविकिरण राठोड, गुणवंत पाटील, सुशील शेंडे, नीलेश पोतदार, अमोल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT