banana crop esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Agriculture News : केळी उत्पादकांना 17 कोटींचा पीकविमा मंजूर

सकाळ वृत्तसेवा

Dhule Agriculture News : पुनर्रचित हवामान आधारित केळी पीकविमा योजनेंतर्गत तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना १७ कोटी २४ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर करण्यात आला आहे.

विम्याच्या रकमेसाठी माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी पाठपुरावा केला होता. (17 crore crop insurance approved for banana producers dhule agriculture news)

तालुक्यातील शिरपूर, बोराडी, अर्थे, जवखेडे, होळनांथे, थाळनेर, सांगवी या सात महसूल मंडळांतील शेतकऱ्यांचा विमा लाभार्थ्यांमध्ये समावेश आहे. त्यांना १७ कोटी २४ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर झाला असून, जवखेडा मंडळातील काही लाभार्थ्यांच्या खात्यावर ४१ लाख रुपये जमा झाले आहेत.

उर्वरित मंडळांतील लाभार्थ्यांच्या खात्यावर रकमा जमा होण्याची प्रतीक्षा असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी कुरबान तडवी, तालुका कृषी अधिकारी साठे, बाजार समितीचे सभापती के. डी. पाटील यांनी दिली.

शेतकऱ्यांची व्याकूळता

केळी (आंबिया बहार) पिकासाठी कमी तापमान १ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी, वेगाचा वारा १ मार्च ते ३१ जुलै, जादा तापमान १ एप्रिल ते ३१ मे, गारपीट १ जानेवारी ते ३० एप्रिल याप्रमाणे ट्रिगर (प्रमाणके)नुसार नुकसानभरपाई देण्याचा शासन निर्णय आहे. या नोंदणीनुसार संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४५ दिवसांच्या आत विम्याची रक्कम देणे आवश्यक आहे.

या कालावधीत रक्कम न मिळाल्यास दसादशे १२ टक्के व्याजासकट नुकसानभरपाई देण्याची तरतूद शासन निर्णयात आहे. मात्र विहित कालावधीत विमा कंपन्या विम्याच्या रकमा देत नसल्याचा अनुभव गाठीशी असल्यामुळे शेतकरी व्याकूळ झाले आहेत. हक्काच्या विम्यासाठी कृषी अधिकारी, विमा कंपनीकडे वारंवार दाद मागावी लागत असल्याने या रकमेचा लाभ तरी मिळेल का, असा प्रश्न त्यांच्यामधून उपस्थित केला जात आहे.

''शासनाने नेमून दिलेल्या निकषाप्रमाणे तापमान, थंडी, वाऱ्याचा वेग, गारपीट यांची प्रमाणके (ट्रिगर) असूनदेखील शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळत नाही. नुकसानभरपाई वेळेत मिळण्यासाठी आणखी काय करू, असा प्रश्न विचारून विमा कंपन्यांकडे पाठपुरावा करणार आहे.''-काशीराम पावरा, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Latest Marathi News Live Update : शेखर गोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT