Nandurbar News esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : कार मोटारसायकलचा अपघातात 2 जण जखमी

सकाळ वृत्तसेवा

शहादा (जि.नंदुरबार) : शहादा-मंदाणा रस्त्यावर मोटारसायकल व समोरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने मोटारसायकलवरील दोघेही जखमी झाले असून, त्यांना शहादा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (2 people injured in car motorcycle accident nandurbar news)

या दोघांच्या हातापायाला दुखापत झालेली असून, ज्ञानेश्वर दत्तू पाटील यांना धुळे येथे हलविण्यात येणार असल्याची वैद्यकीय सूत्रांकडून माहिती मिळाली.

गुरुवारी (ता. १६) सकाळच्या सुमारास मंदाणा येथील ज्ञानेश्वर दत्तू पाटील (वय ४०) व मयूर अशोक मोरे (१६) हे दोघे मोटारसायकल (एमएच ३९, एएच ९५२१)ने दूध खरेदीसाठी शहाद्याकडे येत असताना वापीहून उज्जैनकडे जाणारी स्विफ्ट डिझायर (जीजे १५, सीजे ६३६८) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

यात दुचाकीच्या पुढच्या टायर व हँडलला जोरदार धडक लागल्याने दुचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले. वाहनावरील दोघेही जखमी झाले आहेत. हातापायांना जोरदार मार लागला असून, त्यांना तातडीने शहादा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्विफ्ट डिझायरचे नुकसान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २७ जून २०२६ ते ३ जुलै २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT