umesh kuwar nikhil patil esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Accident News : बाभळे फाट्याजवळ अपघातात; 2 तरुण ठार

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Accident News : कामावरून घराकडे परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार दोन तरुण जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाला.

ही घटना बाभळे (ता. शिंदखेडा) फाट्याजवळ मंगळवारी (ता. ७) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.(2 youths dead in accident near Bable Phata nandurbar news)

नरडाणा औद्योगिक विकास केंद्रातील बेदमुथा कंपनीतून रात्री सुटी झाल्याने उमेश सुभाष कुवर (वय २९, रा. डोंगरगाव, ता. शहादा, जि. नंदुरबार), निखिल आनंदा पाटील (३०, रा. मांडळ, ता. शिंदखेडा) व अमोल संजय भदाणे (रा. मंगरूळ, ता. अमळनेर, जि. जळगाव) हे तिघे मोटारसायकल (एमच १९, बीझेड ०१४३)ने सोनगीरला येत होते.

मात्र, बाभळे फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने उमेश कुवर व निखिल पाटील जागीच ठार झाले. अमोल भदाणे गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी धुळ्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उमेश कुवर व निखिल पाटील यांच्या मृत्यूची बातमी कळताच सोनगीर ग्रामीण रुग्णालयात मित्रपरिवार व नातेवाइकांनी एकच गर्दी केली. सोनगीर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक देशमुख यांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. शिंदखेडा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली.

दिवाळी सण तोंडावर असताना कमावत्या तरुणांचा अपघात झाल्याने त्यांचे कुटुंब शोकसागरात बुडाले. उमेश कुवर येथील बालाजीनगरात राहत होता. त्याच्या मागे दोन वर्षांचा मुलगा, पत्नी, आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. निखिल पाटील अविवाहित असून, वालखेडा (ता. शिंदखेडा) येथे राहत होता. त्याच्या मागे एक भाऊ, आई असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: मोबाईल, हेडफोनवर बोलणाऱ्या बस चालकांची आता खैर नाही, 'पीएमपीएमएल'ने घेतला मोठा निर्णय

आनंदाची बातमी! 'दसरा-दिवाळीसाठी सोलापूर विभागातून २३० जादा गाड्या'; मध्य रेल्वेचा निर्णय, मराठवाड्यासह सोलापूरकरांची पुण्याला जाण्याची सोय

Pune News : ‘किरकी’ नव्हे, आता आपली ‘खडकी’च; मराठी अधिकाऱ्याच्या प्रयत्नांना यश, २०० वर्षांनंतर नावात बदल

Latest Marathi News Updates: सरकारचा १२ लाखांचा महसूल बुडाला, महसूल मंत्री बावनकुळेंनी महिला अधिकाऱ्याचं केलं निलंबन

Asia Cup Hockey 2025 : भारतीय महिलांकडूनही गोलवर्षाव; सिंगापूरचा १२-० ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT