crime news  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : धारदार शस्त्राने भोसकून शिरपूरला तरुणाचा खून

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर (जि. धुळे) : शहरात क्रांतीनगर भागात धारदार शस्त्राने (Weapon) भोसकून २२ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. ४) सायंकाळी घडली. (22 year old youth was stabbed to death with sharp weapon in Kranti Nagar area dhule crime news)

राहुल राजू भोई असे मृत तरुणाचे नाव आहे. तो शिंगावे (ता. शिरपूर) येथील बालाजीनगरचा रहिवासी आहे. शहरातील क्रांतीनगर परिसरात भद्रा चौकात सायंकाळी सातला त्याच्या पोटात चाकूसारख्या तीक्ष्ण हत्याराने भोसकण्यात आले.

रक्तबंबाळ अवस्थेत त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय तपासणीत त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. खुनामागील कारण कळू शकले नसले तरी जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे कळते.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

संशयिताला ताब्यात घेण्यासाठी पोलिस रवाना झाले आहेत. राहुल घरात एकुलता मुलगा होता. श्री खंडेराव महाराज यात्रा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: ठाणे ते दक्षिण मुंबई अंतर केवळ 25–30 मिनिटांत होणार! 13.9 किमी फ्रीवेचा कामाला MMRDA कडून सुरुवात, मार्ग कसा आहे?

Sarfaraz Khan : सर्फराजचे ट्वेंटी-२०त शतक! मुंबई २०० पार... गौतम गंभीर अन् अजित आगरकर यांना 'गार' करणारी अफलातून खेळी

Maharashtra Police Bharti 2025 Update: भावी पोलिसांसाठी मोठी संधी; उमेदवारी अर्ज भरण्याबाबत झाला मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : उमरगा शहरात शंभरी पार केलेल्या आजीने केले मतदान

कलाचा निरोप अद्वैतपर्यंत पोहोचणार... 'लक्ष्मीच्या पावलांनी'मध्ये शेवटी काय घडणार? 'या' दिवशी प्रदर्शित होणार अंतिम भाग

SCROLL FOR NEXT