MLA Farooq Shah  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : मेडिकल कॉलेज, रुग्णालयासाठी 25 कोटी मंजूर; आमदार शाह यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरातील जिल्हा रुग्णालयात १०० खाटांचे स्त्री व बालरुग्णालय, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परीक्षा हॉल व लेक्चर हॉलसाठी, नवीन इमारतीसाठी राज्य शासनाने पुरवणी अर्थसंकल्पात २५ कोटी रुपये मंजूर केले, अशी माहिती धुळे शहराचे आमदार फारुक शाह यांनी पत्रकाव्दारे दिली. (25 crore sanctioned for medical college hospital dhule news)

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. या अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पात विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यात धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयातील १०० खाटांचे स्त्री व बालरुग्णालयाच्या कामासाठी महाराष्ट्र शासनाने अतिरिक्त नऊ कोटी रुपयाची तरतूद केली आहे.

धुळे शहरात एकही शासकीय स्त्री व बालरुग्णालय नसल्यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे १०० खाटांच्या रुग्णालयासाठी अनेक राजकीय पक्षांनी आंदोलने केली. मात्र, आपल्या सततच्या प्रयत्नांमुळे या कामासाठी पावसाळी अधिवेशनात अतिरिक्त निधी शासनाने उपलब्ध करून दिला असल्याचे आमदार श्री. शाह यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी लेक्चर हॉलची अत्यंत आवश्यकता होती. यालाही शासनाने अर्थसंकल्पात मंजुरी दिली. शिवाय वैद्यकीय महाविद्यालयातील अत्याधुनिक शवविच्छेदनगृहाच्या कामासाठीही शासनाने अर्थसंकल्पात मंजुरी दिल्याचे आमदार श्री. शाह यांनी नमूद केले आहे.

रुग्णांची गैरसोय दूर होणार

शासकीय जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील विविध कामांसाठी आपण प्रयत्नशिल होतो. या कामांना मंजुरी मिळाल्यामुळे शहरवासीयांची, रुग्णांची तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गैरसोयी दूर होणार आहेत. शहरातील लोकांना आरोग्य व मूलभूत सोयी सुविधा कशा उपलब्ध करता येतील यासाठी यापुढेही हे काम सुरू राहील असे आमदार श्री. शाह यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT