Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : तिघांना लोखंडी पाइपने मारहाण

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : एक महिन्यापूर्वी वाळूचे ट्रॅक्टर महसूल विभागाला पकडून दिले म्हणून सोमवारी (ता. १) सायंकाळी सातच्या सुमारास चौघांनी तिघांना लोखंडी पाइप व दांडक्याने मारहाण केल्याची घटना रुदाणे (ता. शिंदखेडा) येथे घडली. (3 were beaten with iron pipes for handing over sand tractor to revenue department dhule crime news)

रुदाणे येथील विठ्ठल सखाराम बागूल (वय ५५) यांनी संशयित आरोपी सचिन शानाभाऊ पवार, भूषण शानाभाऊ पवार, भूपेश नानाभाऊ पवार व गणेश नानाभाऊ पवार (सर्व रा. रुदाणे, ता. शिंदखेडा) यांच्या मालकीचे वाळूचे ट्रॅक्टर फिर्यादी विठ्ठल बागूल यांनी महसूल विभागाला महिन्यापूर्वी पकडून दिले व साक्षीदार म्हणून स्वाक्षरी दिल्याच्या कारणावरून ठार करण्याच्या उद्देशाने लोखंडी पाइप व लाकडी दांडक्यांनी फिर्यादी विठ्ठल बागूल यांच्या डोक्यावर व पायावर मारहाण केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

साक्षीदार विठ्ठल नानाभाऊ महाले व महारू फुला सोनवणे यांनाही ठार करण्याच्या उद्देशाने लोखंडी पाइप व दांडक्याने मारहाण केली. जखमींना सोमवारी रात्री धुळे येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विठ्ठल सखाराम बागूल यांनी धुळे शहर पोलिस ठाण्यात जबाब दिल्यावरून शून्य क्रमांकाने शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रशांत गोरावडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

SCROLL FOR NEXT