Bhoomipujan ceremony of Dondwad Vinchur Shirud road work MP Dr. Subhash Bhamre esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : बोरी नदी पट्ट्यात 30 कोटींतून रस्त्यांची कामे

बोरी नदी पट्ट्यातील विविध गावांमध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, नाबार्ड व राज्याच्या अर्थसंकल्पातील तरतुदीतून सुमारे ३० कोटींच्या निधीतून रस्त्यांची कामे मंजूर झाली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : तालुक्यातील बोरी नदी पट्ट्यातील विविध गावांमध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, नाबार्ड व राज्याच्या अर्थसंकल्पातील तरतुदीतून सुमारे ३० कोटींच्या निधीतून रस्त्यांची कामे मंजूर झाली आहेत.

यातील काही कामे सुरू आहेत, तर काही लवकरच सुरू होतील. (30 crore road works in Bori river belt dhule news)

यामुळे बोरी नदीपट्ट्यातील शेतीला बारमाही पाण्यासह रस्त्यांचे जाळेही निर्माण केले जात आहे. यातून शेतकऱ्यांसह ग्रामीण भागातील ग्रामस्थांची दळणवळणाची मोठी सोय होईल, असा विश्‍वास खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत विंचूर (ता. धुळे) येथे राज्यमार्ग १७ ते दोंदवाड ते विंचूर ते शिरूडदरम्यान खासदार डॉ. भामरे यांच्या प्रयत्नाने चार कोटी ४२ लाख ६२ हजार रुपये निधीतून मंजूर झालेल्या.

रस्त्याचे तसेच दहा कोटी ८८ हजार रुपयांच्या निधीतून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर शिरूड-धामणगाव-निमगूळ-बाबरे रस्ताकामाचे भूमिपूजन व बोरी नदीवरील नाबार्डच्या साडेचार कोटी रुपयांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या निमगूळ येथील पुलाचे उद्‌घाटन रविवारी (ता. १४) खासदार डॉ. भामरे यांच्या हस्ते झाले.

खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष विजय गजानन पाटील, बोरकुंडचे माजी लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे, जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील, सुधीर जाधव, राम भदाणे, प्रभाकर भदाणे, भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश सहसंयोजक उत्कर्ष पाटील.

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस शरद पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर पाटील.

सीएमजेएसवायचे अभियंता व्ही. एम. पाटील, बोधगावचे सरपंच अविनाश पाटील, खोरदडचे सरपंच शरद पाटील, नानाभाऊ पाटील, भटू पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

उद्योगवाढीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर

विंचूर येथे रस्ताकामाच्या भूमिपूजनप्रसंगी खासदार डॉ. भामरे म्हणाले, की गेल्या सहा महिन्यांत १२० कोटी रुपये निधीतून विविध रस्त्यांची कामे मंजूर केली. लवकरच ती पूर्णत्वास जातील.

श्री. भदाणे म्हणाले, की खासदार डॉ. भामरे यांच्या प्रयत्नांमुळे बोरी पट्ट्यात २४ कोटींची कामे मंजूर आहेत. विकासासाठी निधी आणणारे एकीकडे व या कामांचे श्रेय घेणारे दुसरेच अशी स्थिती असल्याची टीकाही श्री. भदाणे यांनी केली.

आमदारांनी फुकटचे श्रेय घेऊ नये

शिरूड येथील कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील म्हणाले, की अनेक वर्षांपासून प्रलंबित शिरूड-धामणगाव-वणी-निमगूळ-बाबरे रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा दोनअंतर्गत आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून दहा कोटी ८८ लाख रुपये निधी मंजूर झाला.

राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असून, पालकमंत्री गिरीश महाजन व खासदार डॉ. भामरे यांच्या पाठपुराव्याने निधी मंजूर करून आणला.

धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी परस्पर या कामाचे भूमिपूजन करून फुकटचे श्रेय घेऊ नये, असेही श्री. पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT