Water scarcity esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : जिल्ह्यातील 302 गावांसह 39 वाड्यांना टंचाईची झळ

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : जिल्ह्यात या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम आगामी काळात पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नऊ कोटी ७६ लाखांचा टंचाईचा आराखडा तयार केला आहे.

जिल्ह्यात पुढील वर्षात ३०२ गावे, ३९ वाड्यांना टंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य टंचाई आराखड्यात ३४४ उपाययोजनांचा समावेश केला आहे.(302 villages in district are facing water shortage dhule news )

जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविली. शिवाय सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये उन्हाचा तडाखा जाणवला. जिल्ह्यात सरासरी ५३५.१० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना तुलनेत ४३३.७० मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या तुलनेत ८१.१० टक्के पाऊस झाला.

त्यामुळे जिल्ह्यात टंचाईचे सावट आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या आढाव्यानंतर प्रशासनाने टंचाई आराखडा तयार केला आहे.

पाणीटंचाईची भीती

ऑक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून अशा तिमाहीनुसार टंचाई आणि आराखडा तयार करण्यात आला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या पहिल्या तिमाहीत शिंदखेडा व साक्री तालुक्यांतील १६८ गावे, एका वाडीत टंचाईची शक्यता आहे. जानेवारी ते मार्चदरम्यान शिरपूर वगळता तीन तालुक्यांतील ७२ गावे, चार वाड्यांमध्ये टंचाईची शक्यता आहे.

तसेच एप्रिल ते जून या तीन महिन्यांत संपूर्ण जिल्ह्यात ६२ गावे, ४० वाड्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होण्याची भीती आहे. सध्या शिंदखेडा तालुक्यात सप्टेंबरपासूनच टंचाई आहे. त्यामुळे एका गावाला टँकरने पाणीपुरवठा होत आहे, तर ३० गावांमध्ये विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे, असे प्रशासनाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT