Swapnil Gaikwad carrying the torch from Ujjain to Shirdi. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : मशालज्योत घेऊन साईभक्ताची 364 किलोमीटर अनवाणी दौड

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : त्याने नवस उपवासाचा मानलेला नाही, चालण्याचा मानलेला नाही, तर चक्के अनवाणी धावण्याचा नवस तो पाच दिवसांत पूर्ण करीत आहे. तो उज्जैनपासून शिर्डीपर्यंत चक्क ३६४ किलोमीटर अनवाणी धावत आहे. एका हातात मशालज्योत आहे.

ही ज्योत तो नवरात्रीनिमित्त साईबाबांना वाहणार आहे. (364 km race of Sai devotee carrying mashal dhule news)

त्याची पाच दिवसांची भक्ती साऱ्यांनाच आश्चर्यचकित करायला लावणारी आहे. स्वप्नील गायकवाडचे ठिकठिकाणी स्वागतही होत आहे.

उज्जैन येथील गायकवाडचा शिर्डीपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. तो एक कुशल धावपटू आहे. त्याने नवरात्रीत शिर्डीच्या साईबाबांना मशालज्योत चढविण्याचा नवस केला आहे.

तो या नवरात्रीत पूर्ण करीत आहे. शिर्डीपर्यंतचे अंतर केवळ पाच दिवसांत पूर्ण करीत आहे. तीन दिवसांत धुळे गाठले आहे. त्याच्यासोबत वाहनामधून मित्र प्रवास करीत आहेत.

गायकवाडने सांगितले, की जीवनात शांती, सुबत्ता आणि समृद्धी यावी. माझ्या क्षेत्रात मी यशस्वी व्हावा, यासाठीही हा नवस मानलेला आहे. या प्रवासात त्याचे ठिकठिकाणी स्वागत होत आहे. प्रत्येकाला पायी अधिक चालण्याचा व वृक्षारोपण करण्याचा संदेश देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT