goats esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : बिबट्यासदृश वन्यप्राण्याकडून 4 शेळ्यांचा फडशा

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : दाऊळ (ता. शिंदखेडा) येथे बिबट्यासदृश वन्यप्राण्याने चार शेळ्यांचा फडशा पाडला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दाऊळ येथील रहिवासी हारून खाटीक यांच्या घरामागील भागात गुरुवारी (ता. १६) रात्री शेळ्या बांधलेल्या होत्या.

शुक्रवारी (ता. १७) रात्री दोन ते पाचच्या दरम्यान बिबट्यासदृश वन्यप्राण्याने त्यांच्या चार शेळ्यांचा फडशा पडलेला दिसला. (4 goats died due to leopard like animal dhule news)

यामुळे खाटीक कुटुंब भयभीत झाले आहे. याबाबत त्यांनी गावातील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र भामरे यांच्याशी संपर्क साधत त्यांनी याबाबत वन विभाग व पशुवैद्यकीय अधिकारी यांना माहिती दिली असता पशुधन विकास अधिकारी डॉ. सीमा शिंदे व डॉ. सुरेश राजभोज यांना घटनेबद्दल माहिती दिली.

तर शेळ्यांचे शवविच्छेदन पशुधन अधिकाऱ्यांनी केले, तसेच वन विभागाचे प्रवीण वाघ, वनपाल दोंडाईचा, चंद्रकांत बोरसे, वनरक्षक केले, एन. एफ. पठाण, वनरक्षक विखरण यांनी भेट देऊन पंचनामा व घटनेची माहिती घेतली.

तसेच या वेळी ग्रामस्थांनी वन्यप्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा,अशी मागणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वन्यप्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नरेंद्र भामरे, डिगंबर माळी, शकील खाटीक, अमीन खाटिक, धनराज माळी, रत्नदीप पवार, नारायण पवार, आकाश पवार, शंकरदादा कोळी, मनोज पवार, नरेंद्र पाटील, सखाराम कुमार, मयूर सोनवणे, वसंत पाटील, भाऊसाहेब बिलाडे, यशवंत माळी, संदीप सोनवणे, सुरेश गिरासे, विजय जगताप, महेंद्र वाघ, प्रशांत पाटील, चंद्रकांत चौधरी, श्रावण कुंभार, हेमंत जाधव, ललित भामरे, जिजाबराव माळी, मनोहर सूर्यवंशी, मनोज सैंदाणे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT