The Shiv Sena (Ubatha) party office bearers and activists while giving a statement of this demand to municipal commissioner Amita Dagde-Patil, start the bandh pathlamps in the city before Navratri festival. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : नवरात्रोत्सवापूर्वी पथदीप सुरू न झाल्यास आंदोलन; धुळे शहरातील 40 टक्के पथदीप बंद

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरातील सुमारे ४० टक्के पथदीप बंद अवस्थेत आहेत, असा आरोप करत नवरात्रोत्सवापूर्वी हे पथदीप सुरू न झाल्यास शिवसेनास्टाइल आंदोलन करू, असा इशारा शिवसेना (उबाठा) पक्षाने महापालिका आयुक्तांना दिला.

सुमारे तीन वर्षांपूर्वी संपूर्ण धुळे शहरातील एलईडी पथदीप लावण्याचा १५ ते १७ कोटी रुपयांचा ठेका महापालिकेने दिला. (40 percent of streetlights is off in dhule news )

पथदीपांचा मेटेनन्स ठेकेदाराकडे होता. ठेक्याच्या रकमेपैकी सुमारे दहा कोटी रुपये देयक मनपाकडून ठेकेदाराला अदा करण्यात आले आहेत, मात्र हे देयक अदा करण्यापूर्वी टेंडरमधील अटी-शर्तीप्रमाणे झाले आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यात आलेली नाही.

सत्ताधारी भाजपमधील काही पदाधिकारी व काही नगरसेवकांच्या दबावापोटी अथवा त्यांचे प्रशासनातील काही संबंधित अधिकाऱ्यांशी असलेल्या बेकायदा संगनमताने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार या कामात करण्यात आला आहे, असा आरोप शिवसेना (उबाठा) पक्षाने केला. अटी-शर्तीप्रमाणे चांगल्या दर्जाचे एलईडी लाइट न लावल्यामुळे ते काही दिवसांत अथवा महिन्यातच बंद पडतात.

ठेकेदार पैसे घेऊनही देखभाल-दुरुस्तीचे काम करत नाहीत. देखभाल-दुरुस्तीचे काम महापालिकेच्या तुटपुंज्या मनुष्यबळावर याचा अतिरिक्त भार टाकण्यात येतो.

मर्क्युरी लाइट गेले कुठे?

भाजप महापालिकेत सत्तेत धुळे शहरात मर्क्युरी लाइट्स लावण्यात आले होते. मर्क्युरी लाइट्स चांगल्या क्वालिटीचे असल्याने पुनःपुन्हा देखभाल-दुरुस्तीची गरज पडत नव्हती. तसेच पूर्वी प्रभाग-विभागनिहाय पथदीपांचे स्वतंत्र टेंडर काढले जायचे. त्यामुळे ठेकेदारांकडून व्यवस्थित काम करून घेतले जात असे.

मात्र, ही व्यवस्था बंद करून केवळ एकाच ठेकेदारास ठेका का देण्यात आला, यात काही गौडबंगाल आहे का, असा नागरिकांचा सवाल असल्याचे शिवसेना (उबाठा) पक्षाने म्हटले आहे. जुन्या मर्क्युरी लाइट्सची परस्पर विल्हेवाट लावून देखाव्यासाठी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेने (उबाठा)ने केला आहे.

महिलांमध्ये भीती

नवरात्रोत्सवात विशेषतः महिला रात्री-पहाटे देवीच्या मंदिरात जात असतात. तसेच गरबा-दांडिया उत्सवाचे आयोजन ठिकठिकाणी होते. अनेकदा टवाळखोरांकडून अंधारात महिला-मुलींची छेड काढण्याचा प्रकार होतो. पथदीप नसल्याने अतिप्रसंग झाल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. चेन स्नॅचिंगच्या घटनाही घडतात.

या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवापूर्वी पथदीपांची व्यवस्था करावी, अन्यथा शिवसेनास्टाइल आंदोलन करू, असा इशारा शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख धीरज पाटील, महानगरप्रमुख डॉ. सुशील महाजन, देवीदास लोणारी, विधानसभा संघटक ललित माळी, मच्छिंद्र निकम, कैलास मराठे, छोटू माळी, अमजद पठाण, आरिफ शाह, गुलाब धोबी आदींनी मागणीचे निवेदन मनपा आयुक्तांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT