Special Inspector General of Police of Nashik area Dr. B. G. Shekhar Patil esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime Case: 48 लाखाचा मुद्देमाल मुळ मालकांना परत; पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेने भारावले नागरिक

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime Case : दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी यांसारख्या जिल्ह्यातील मालमत्तेच्या गुन्ह्यांचा पोलिस दलाकडून तपास करून तो उघडकीस आल्यानंतर हस्तगत केलेला ४८ लाख रुपयांचा मौल्यवान मुद्देमाल व वाहने मूळ मालकांना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते परत करण्यात आला. (47 lakh worth of goods returned to original owners Nandurbar Crime Case psl)

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक आगामी सण, उत्सवाच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आढावा, गुन्हे आढावा घेण्यासाठी आले असता त्यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाणे येथे भेट देऊन पोलिस ठाण्याचे गुन्हे अभिलेख, स्वच्छता याबाबत समाधान व्यक्त केले.

नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत नोंद असलेल्या गहाळ मोबाईलबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी माहिती घेतली असता मोठ्या प्रमाणावर मोबाईल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांत तक्रारदारांनी

मोबाईल हरविल्याबाबत दिलेल्या तक्रारींचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक विश्लेषण शाखेने करून नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यांत व गुजरात, मध्य प्रदेशात जाऊन त्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून मोबाईल हस्तगत करण्यात आले.

हस्तगत करण्यात आलेले सुमारे १२ लाख रुपये किमतीचे १२५ मोबाईल विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या हस्ते मूळ तक्रारदारांपैकी १५ तक्रारदारांना प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानपूर्वक परत करण्यात आले.

हरविलेल्या मोबाईलचा शोध घेऊन ते प्राप्त करून मूळ तक्रारदारांना परत करण्याच्या कामगिरीत नंदुरबार जिल्हा अग्रेसर राहिला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नंदुरबार जिल्हा पोलिस दलाकडून उघडकीस आणलेल्या दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी यांसारख्या जिल्ह्यातील मालमत्तेच्या ३० गुन्ह्यांतील ३५ लाख ९७ हजार ३४ रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने, मोटारसायकली, रोख रक्कम व इतर मुद्देमाल तसेच नागरिकांचे गहाळ/हरविलेले १२ लाख रुपये किमतीचे १२० मोबाईल असा एकूण सुमारे ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ तक्रारदारांना परत करण्यात आला.

जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन, शहादा

विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, अक्कलकुवा विभागाचे उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह नंदुरबार विभागातील पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

ज्येष्ठ महिला भावविवश

उपस्थितांपैकी काही मूळ मालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी पोलिस दलाच्या कामाचे कौतुक करून पोलीस दलावरील विश्वास दृढ झाल्याचे सांगितले.

ज्येष्ठ महिला फिर्यादीने भावविवश होत त्यांचे परत मिळालेले सौभाग्याचे लेणे त्यांच्या पतीच्या हाताने गळ्यात घालण्याची विनंती केल्याने पतीस बोलावून पत्नीच्या गळ्यात सौभाग्य लेणे घालण्यात आले. त्या वेळी त्यांचे आनंदाश्रू त्या लपवू शकल्या नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी ७५ व्या वर्षी राजकारणातून निवृत्त व्हावं का? शरद पवारांनी एका वाक्यात सांगितलं, देवाभाऊंवरी टीका

Gadchiroli News: दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली जिल्ह्यातील मोडस्के जंगल परिसरात चकमक

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

बाबो! सुरज चव्हाणचं खरंच लग्न ठरलं? सोशल मीडियावर शेयर केलेली पोस्ट चर्चेत, चाहत्यांचा म्हणाले..."हीच का आपली वहिनी?"

SCROLL FOR NEXT