5 criminals deported from Nandurbar district for 2 year
5 criminals deported from Nandurbar district for 2 year esakal
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार : गुन्हेगारी टोळीतील 5 जण 2 वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारांवर वचक राहावा, याकरिता नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी गुन्हेगारी टोळीतील पाच जणांना नंदुरबार जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेले आहे. हद्दपार केलेले पाचही जण शहादा तालुक्यातील आहेत.

नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलिस दलाचा कार्यभार स्वीकारल्यापासून नंदुरबार शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी बाधा ठरणारे तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणाऱ्यांची माहिती घेतली. त्यांचेवर दाखल गुन्ह्यांचा आढावा घेतला असता शहादा , म्हसावद पोलिस ठाणे हद्दीतील काही आरोपी त्यांची दहशत व वचक ठेवण्यासाठी बेकायदेशीररीत्या टोळी तयार करुन नियमितपणे मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे असल्याचे निदर्शनास आले. शहादा व म्हसावद पोलिस ठाणे हद्दीत राहणाऱ्या टोळीतील ५ जणांविरुद्ध मालमत्तेविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यावरुन म्हसावद पोलिस ठाणेकडून एक टोळीस हद्दपार करणेबाबतचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाला. पोलिस अधीक्षक श्री. पाटील यांनी आढावा घेऊन प्रस्तावाची छाननी केली. तसेच योग्य ती कायदेशीर प्रकिया पार पाडून पाचही जणांना दोन वर्षासाठी नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात योगेश कृष्णा पवार (वय २५ रा. सुलवाडे पो. सुलतानपूर ता. शहादा), अजय आंबालाल मोरे (वय २४ रा . सुलवाडे पो . सुलतानपूर ता . शहादा ), सोमनाथ काशिनाथ दशरथ (रा . सुलवाडे पो . सुलतानपूर ता . शहादा), आकाश राजु शेमळे (वय -२० रा . सुलवाडे पो . सुलतानपूर ता . शहादा), अजय ऊर्फ टायगर राजेंद्र पावरा (वय -२२ रा . ब्राम्हणपुरी ता . शहादा) यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

Summer Home Decor Tips: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा करुन घ्या फायदा; 'अशा' पद्धतीने करा घराचा मेकओव्हर.. सर्वजण पाहतच राहतील

SCROLL FOR NEXT