Dhule News : तालुक्यातील ग्रामीण भागांसाठी राज्याच्या ग्रामविकास विभागातर्फे १४ ऑगस्टच्या शासननिर्णयानुसार पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यातून २० गावांमधील २५ कामे साकारण्यात येणार आहेत. (5 crore sanctioned for development works in rural areas dhule news)
येथील आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा व प्रियदर्शनी सूतगिरणीचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी या कामांसाठी पाठपुरावा केला होता.
ग्रामविकास विभागाने जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २५१५-१२३८ अंतर्गत विकासकामांची यादी नुकतीच जाहीर केली. त्यात तालुक्यातील २० गावांमधील विकासकामांचा समावेश आहे.
गावातील गाव दरवाजा, जलवाहिनी, संरक्षण भिंत, बंदिस्त गटारी, सभामंडप, समाजमंदिराचे बांधकाम, काँक्रिटीकरण आदी मूलभूत सुविधांचे अद्ययावतीकरण या कामांद्वारे शक्य होणार आहे. गावनिहाय मंजूर काम आणि निधी असा ः
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सुळे : गाव दरवाजाचे बांधकाम (५० लाख), इलेक्ट्रिक खांबाची सुविधा (३० लाख), रस्ता काँक्रिटीकरण (५० लाख), पेयजलासाठी जलवाहिनी टाकणे (२० लाख), सभागृहाचे बांधकाम (१० लाख), बंदिस्त गटारीचे बांधकाम (२० लाख), नवा चांदसूर्या : सभामंडप बांधणे (१५ लाख), अर्थे खुर्द : संरक्षण भिंतीचे बांधकाम (२० लाख), साकवद : रस्ता काँक्रिटीकरण (२० लाख), दहिवद : रस्ता काँक्रिटीकरण (२० लाख), जापोरा : आदिवासी वस्तीत सभामंडप बांधकाम (१५ लाख),
आढे : सभामंडपाचे बांधकाम (२० लाख), खर्दे बुद्रुक : रस्ता काँक्रिटीकरण (२० लाख), मांजरोद : समाजमंदिर बांधकाम (२० लाख), नांदर्डे : रस्ता काँक्रिटीकरण (१५ लाख), गधडदेव : रस्ता काँक्रिटीकरण (१५ लाख), वाडी बुद्रुक : सभामंडप बांधकाम (१५ लाख), बभळाज : सभामंडप बांधकाम (१५ लाख), जुने भामपूर : रस्ता काँक्रिटीकरण (२० लाख), जुना चांदसूर्या : काँक्रिटीकरण (१५ लाख), वाडी खुर्द : काँक्रिटीकरण (१५ लाख), भरवाडे : रस्ता काँक्रिटीकरण (२० लाख), आंबे : रस्ता काँक्रिटीकरण (२० लाख), असली : रस्ता काँक्रिटीकरण (१० लाख), सावेर : अमरधामचे बांधकाम (१० लाख).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.