उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : देवभानेत परप्रांतीयाकडून 5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : देवभाने (ता. धुळे) गावाजवळील एका कंपनीत कामास असलेल्या कुटुंबातील पाच वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. संशयितदेखील त्याच कंपनीत कामास आहे.

मुलीला आपल्या घरात बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)


बुधवारी (ता. २०) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पीडित कुटुंबांच्या शेजारी राहणाऱ्या दिनेश गणावर साहनी ऊर्फ बडका बाबू (वय ३३, रा. हंतराल, जि. मुज्जफरपूर, बिहार, सध्या रा. देवभाने, ता. धुळे) याने बालिकेस हाक मारून घरात बोलावले.

तिचे आई-वडील व संशयित एकाच कंपनीत कामाला असल्याने पीडित त्याला ओळखत होती. म्हणून ती संशयिताने बोलावल्याबरोबर गेली.

तिथे त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलगी कुठे गेली म्हणून तपास करीत तिच्या आईने हाका मारल्या. त्यावर पीडितेने जवळच्या शेडमधून प्रतिसादात्मक होकार दिला. तिथे जाऊन पाहिल्यावर लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा उलगडा झाला.

या प्रकरणी दिनेश साहनी यास अटक झाली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश फड तपास करीत आहेत. संशयितास धुळे न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Kolhapur Train : पुणे-कोल्हापूर रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! विशेष दर्जा हटल्याने तिकीट दर घटणार; 'या' तारखेपासून धावणार नव्या क्रमांकाने

Solapur Ration News: मोफत धान्य घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोलापूरमध्ये १.११ लाख रेशनकार्डधारक अपात्र; लाभ कायमचा बंद होणार

Mira-Bhayandar Metro: अनर्थ टळला! स्कूल बस पुढे गेली अन् मीरा-भाईंदर मेट्रो कामादरम्यान स्लॅब कोसळला; VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईतील आयकर विभागाच्या कार्यालयाला आग; अग्निशमन दलाच्या ८ ते ९ गाड्या घटनास्थळी दाखल

सचिन पिळगावकरांसोबत अफेअरच्या चर्चा; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं सत्य; म्हणाली- आम्ही एकमेकांना खूप...

SCROLL FOR NEXT