6 accused arrested in shooting incident Nandurbar Crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime : गोळीबार घटनेतील 6 आरोपींना अटक; 2 गटांतील मृतांसह 14 जणांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृतसेवा

Nandurbar Crime : मलगावचा पिपल्यापाडा (ता. शहादा) शिवारात शासकीय वनजमिनी मालकी हक्कावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी होऊन त्यात गावठी कट्ट्याने केलेल्या गोळीबारात पिता व पुत्र ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता. २७) घडली होती.

हाणामारीत पाच जण जखमी झाले असून, त्यांच्यावर नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ( 6 accused arrested in shooting incident Nandurbar Crime news)

दरम्यान, या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर दिलेल्या फिर्यादीवरून शहादा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. यात मृत दोन्ही व्यक्तींसह एकूण घटनेत १४ आरोपी करण्यात आले आहेत. दोन मृत वगळता १२ आरोपींपैकी चार जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुरुवारी कलम ३०२ अन्वये अरुण राजेंद्र पावरा व सोनीबाई गणेश खर्डे या दोघांना, तर कलम ३०७ अन्वये जगदीश रायसिंग खर्डे, नीलेश रायसिंग खर्डे, देवेसिंग रायसिंग खर्डे, शकुंतला रायसिंग खर्डे या चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, दोन्ही गुन्ह्यांतील एकूण सहाही आरोपींना अटक करून शहादा न्यायालयात हजर केले असता त्यांना ३१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, गोळीबारात मृत्यू झालेल्या अविनाश व सुकराम खर्डे यांच्यावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी खबरदारीचा उपाय म्हणून गावात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

दरम्यान, हाणामारीत तलवार, लोखंडी सळी, लाठ्या तसेच गावठी कट्ट्याचा वापर करण्यात आला होता. आता गोळीबारात वापरण्यात आलेला गावठी कट्टा नेमका कुठून आणला होता, गावठी कट्टा हा मध्य प्रदेशातून सातपुड्याच्या दुर्गम भागातून आणलेला असावा, असा अंदाज लावण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक नितीन पाटील व प्रतापसिंग मोहिते करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT