The clothes thrown away after thieves stole from the house of former sarpanch Shivaji Patil here. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : विखरणीत 5 घरामध्ये जबरी घरफोडी; 7 लाखांचा ऐवज चोरी

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : येथे शुक्रवारी (ता.१५) रात्री चोरट्यांनी एकाचवेळी चार घरांमध्ये प्रवेश करीत घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सुमारे सहा ते सात लाख रुपये चोरुन नेले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे तीन घरांपैकी एक घर बंद तर दोन घरांमध्ये मालक व त्यांचे कुटुंब होते.(7 lakhs instead of theft in 5 house burglary dhule crime news)

चोरांच्या शोधार्थ पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहे. घरफोडीतील चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिस दलासमोर आहे. विखरण येथे एकाच रात्री पाच घरांमध्ये शुक्रवारी रात्री प्रवेश करून सहा ते सात लाख रुपये घेऊन पोबारा केला.

माजी सरपंच शिवाजी पाटील घरात झोपले असताना चोरांनी घरातील गोदरेज कपाट उघडून व घरातील डबे काढून त्यातील रोख अठरा हजार व आठ ते दहा ग्रॅम सोने चोरून नेले. तसेच सुपडू इशी याच्या घराचे कुलूप तोडून घरातील एक लाख ४७ हजार रुपये आणि विजय युवराज पाटील याच्या घरातून वीस ते पंचवीस ग्रॅम सोने आणि पन्नास हजार रोख असा ऐवज नेला.

जिजाबराव पाटील याच्या घरातून पाच ग्रॅम सोन्याची वस्तू तर मुरलीधर दगा पाटील यांच्या घरात ते झोपले असताना चोरांनी प्रवेश केला. परंतु त्यांच्या हाती काहीही लागले नाही. घटनेची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी श्‍वानपथकासह दाखल होत चोरट्यांचा माग काढण्यास सुरवात केली. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद नव्हती.

सूचनेनंतर दोन दिवसात चोरी

दोंडाईचा व परिसरात मोठ्या प्रमाणावर चोऱ्या व अवैध व्यवसाय वाढीवर पोलिसांनी लक्ष घालून कार्यक्षमता वाढवावी अशा सूचना आमदार जयकुमार रावल यांनी दोंडाईचात रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी उपस्थित पोलिस निरीक्षकांना सांगितले होते.

परंतु दोन दिवस उलटत नाही तोच चोरांनी आपला मोर्चा ग्रामीण भागात वळवीत रात्रीतून चार ते पाच घरे फोडली. त्यामुळे सूचना करुनही चोऱ्या झाल्या कशा असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. यातच ग्रामस्थांनी संबंधित गावाच्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT