75 crore turnover on dasara in dhule news 
उत्तर महाराष्ट्र

Dasara 2023 : धुळ्यात 75 कोटींची उलाढाल; सीमोल्लंघनासह वाहने, सोने खरेदीसाठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा

Dasara 2023 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक विजयादशमीनिमित्त आग्रा रोडवरील मुख्य बाजारपेठेसह वाहन, सोने खरेदीसाठी मंगळवारी (ता. २४) नागरिकांची झुंबड उडाली. शहरातील सर्वच रस्ते आणि बाजारपेठ गर्दीने फुलली.

सोन्या-चांदीसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचर, दुचाकी-चारचाकी वाहने, फ्लॅट व जागा खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. दसऱ्यानिमित्त बाजारपेठेत सुमारे ७५ कोटींची उलाढाल झाल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग यांनी सांगितले. (75 crore turnover on dasara in dhule news)

बहुसंख्य नागरिकांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर विविध वस्तू, साधने खरेदीसाठी आगाऊ नोंदणी केली होती. नंतर मंगळवारी खरेदीचा मुहूर्त साधला. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीचे दागिने खरेदीस अनेक जण प्राधान्य देतात. या पार्श्वभूमीवर सराफ बाजारासह शहर परिसरातील विविध प्रतिष्ठानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली. नामांकित सुवर्णपेढ्यांमध्ये मोठी गर्दी दिसली.

गृहोपयोगी साधने खरेदी

इलेक्ट्रॉनिक्स, होम अ‍ॅन्ड किचन अप्लायन्स बाजारातही मोठी उलाढाल झाल्याचे दिसले. एलईडी, स्मार्ट टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, संगणक, लॅपटॉप, मिक्सर, मायक्रोवेव्ह, टोस्टर, ज्यूसर, रोटी मेकर, वॉटर प्युरिफायरसह मोबाईल खरेदीला नागरिकांनी पसंती दिली. विक्रेत्यांनी दिलेल्या खास सवलती आणि ऑफर्सचा ग्राहकांनी लाभ घेतला.

त्यामुळेच यंदा ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला. अँड्रॉइड मोबाईललादेखील तरुणाईसह ज्येष्ठांनी पसंती दिल्याचे चित्र होते. रेडिमेड कपडे, साड्या आदी कपडे खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी सेलद्वारे दालने सज्ज ठेवल्याचे दिसून आले.

वाहन बाजारात तेजी

ऑटोमोबाईल क्षेत्राला तेजी मिळाली. दुचाकी, चारचाकी वाहने, ट्रॅक्टर खरेदीला मोठा प्रतिसाद मिळाला. यात सरासरी पाचशेवर दुचाकी व दीडशेवर चारचाकी वाहनांची आगाऊ नोंदणी होती. पुरवठा कमी व मागणीत वाढ यामुळे चारचाकी वाहनांसाठी अनेकांना नोंदणी करूनही दोन ते तीन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी दिसली. वाहन बाजारात सरासरी २० ते २५ कोटींची उलाढाल झाली. दसऱ्याच्या मुहूर्तावर काही फ्लॅटसचे बुकिंग, नवीन साइटचे भूमिपूजनही झाले. सरासरी अडीचशेवर कुटुंबीयांनी गृहप्रवेश केल्याचे सांगितले गेले. त्यातून सरासरी २५ ते ३० कोटींवर उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

दिवाळीसाठी आशा पल्लवित

सराफा बाजारात सोने प्रतितोळा ६१ हजार रुपये, तर चांदी प्रतिकिलो ७३ हजार रुपयांप्रमाणे विक्रीस होती. बाजारपेठेत वाहने, सोने खरेदीला अधिक प्रतिसाद मिळाला. नंतर कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू व अन्य साहित्य, साधने खरेदीला नागरिकांनी प्रतिसाद दिला. धुळ्यातील सरासरी ७५ कोटींच्या उलाढालीमुळे दिवाळीतील व्यवसायाबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत. तसेच संकेत दसऱ्याने व्यापारी, व्यावसायिकांना दिल्याचे श्री. बंग यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चिंचोळी एमआयडीसीतील अवैध दारूच्या फॅक्टरीचा मालक बार्शीचा! जूनमध्ये बंद मिल्क प्रॉडक्टची जागा ‘होमनेट’साठी केली ट्रान्स्फर, पोखरापूरच्या बापू भोसलेच्या मदतीने टाकला तिसराच उद्योग, वाचा...

Potato Egg Salad: फक्त बटाटे, अंडी आणि दही... 10 मिनिटांत तयार करा Viral Potato Egg Salad; नाश्त्यासाठी प्रोटीनयुक्त आणि टेस्टी रेसिपी

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

SCROLL FOR NEXT