80 sacks of soybean stolen  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : सोयाबीनच्या 80 गोण्या लंपास

दहिवेल (ता. साक्री) शिवारातून चोरट्यांनी सोयाबीनच्या तब्बल ८० गोण्या लंपास केल्या.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : दहिवेल (ता. साक्री) शिवारातून चोरट्यांनी सोयाबीनच्या तब्बल ८० गोण्या लंपास केल्या. त्यांची किंमत दोन लाख आठ हजार रुपये आहे.

या प्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. (80 sacks of soybean stolen dhule crime news)

दहिवेल येथील आदर्श विद्यालयासमोर संजयकुमार पंडितराव गवळी (वय ४४) वास्तव्यास आहेत. त्यांनी गावशिवारातील त्यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी जाळी असलेल्या कांदाचाळीत सोयाबीनच्या दोनशे गोण्या ठेवल्या होत्या.

चोरट्यांनी ३० ते ३१ डिसेंबरदरम्यान या कांदाचाळीतून सोयाबीनच्या ८० गोण्या नेल्या. त्यांची किंमत ५० रुपये किलोप्रमाणे दोन लाख आठ हजार इतकी आहे.

याबाबत संजयकुमार गवळी यांनी साक्री पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक रोशन निकम तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Case : पुणे पोर्शे प्रकरणातील आरोपीची जामिनावर सुटका होताच जंगी पार्टी, गळ्यात नोटांचा हार घालून पत्नीसोबत डान्स; Video Viral

RCB vs GT: विराट कोहलीने गुजरात टायटन्सला दाखवला, 'बाबाजी का ठूल्लू' अन् फायनलला पोहचताच अनुष्काला मारली मिठी; Video Viral

Beed: साखरपुड्यानंतर PSIने अचानक लग्नाला दिला नकार, बंदुकीचा धाक दाखवल्याचा तरुणीच्या कुटुंबाचा आरोप

Sangli Crime: मुलगा होत नाही, माहेरहून सोनंही आणत नाहीस; पलूसमध्ये विवाहितेचा छळ, संशयास्पद मृत्यूने खळबळ

'लाल लाल करलची बांगडी...' संजू राठोडच्या गाण्यावर जान्हवी किल्लेकरचा डान्स, संजू राठोड कमेंट करत म्हणाला...

SCROLL FOR NEXT