Cupboard broken by thieves. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : गावात घरफोडीत 9 लाखांचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : खर्दे बुद्रुक (ता. शिरपूर) येथे शनिवारी (ता. ११) मध्यरात्री धाडसी घरफोडी करून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोकड मिळून सुमारे नऊ लाखांचा ऐवज नेला. ऐन दिवाळीच्या सणाला चोरटे सक्रिय झाल्याने ग्रामीण भागात दहशत पसरली आहे.

मगन बाबूलाल गुजर यांच्याकडे ही घरफोडी झाली. (9 lakhs stolen of house burglary in village dhule crime news )

ते सहकुटुंब घरात झोपले होते. घराचा मागील दरवाजा उघडून चोरांनी आत प्रवेश केला. गुजर यांच्या घरातील स्वयंपाकघराच्या शेजारी असलेल्या खोलीतील कपाट फोडून चोरट्यांनी १४ तोळे सोन्याचे दागिने, ९० हजार रुपये रोख आणि अर्धा किलो चांदी असा सुमारे नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला.

श्री. गुजर यांचे पुतणे ॲड. दिनेश गुजर यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोचले. शहर पोलिसांनी अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला.

देवघरातही प्रयत्न

चोरट्यांनी गुजर यांच्या घरातील देवघरही सोडले नाही. देव्हाऱ्याच्या कप्प्यांचीही चोरट्यांनी कसून तपासणी करीत तेथील साहित्य अस्ताव्यस्त केले.

दुचाकीही लंपास

दरम्यान, शनिवारी रात्रीच चोरट्यांनी खर्दे गावातील पत्रकार मुकेश शेवाळे यांच्या मालकीची होंडा शाइन दुचाकी (एमएच १८, बीबी ३९६९) नेली. शेवाळे यांनी अंगणात दुचाकी लावली होती. ती चोरीस गेल्याचे सकाळी निदर्शनास आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT