abdul sattar statement about sanjay raut nandurbar news esakal
उत्तर महाराष्ट्र

Abdul Sattar News: संजय राऊत आमच्या मतांवर खासदार : अब्दुल सत्तार

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News: पुढची गुढी आपलीच असणार, असे म्हणणारे खासदार संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून दाखवावे, त्या वेळेस तुमचे सरकार येईल, असा टोला लगावत अब्दुल सत्तारांनी (Abdul Sattar) संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विधानाचा समाचार घेतला. (abdul sattar statement about sanjay raut nandurbar news)

नंदुरबार तालुक्यातील गारपीटग्रस्त भागातील नुकसानीच्या पाहणीसाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार बुधवारी (ता. २२) आले होते. या वेळी पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, की राऊत आमच्या मतांवर निवडून आलेले आहेत.

त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. त्यांच्यात हिंमत असेल तर दादा भुसे यांनी दिलेले चॅलेंज स्वीकारावे आणि पुन्हा निवडून दाखवावे. त्या वेळेस तुमचे सरकार येईल आणि राऊत यांनी राजीनामा दिला नाही तर दोन-चार पिढ्या यांचे सरकार येणार नाही. राऊत यांचा नातू जरी आला तरी सरकार येणार नाही, असे सत्तार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

राऊत यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर केलल्या आरोपांनाही सत्तारांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, की राऊत कधीच खरे बोलत नाहीत, त्यामुळे दादा भुसे यांनी दिलेल्या चॅलेंजमुळे मिरची लागत आहे.

राऊत बोटावर मोजण्याइतक्या आमदार-खासदारांचे नेते आहेत. त्यांनी विचारपूर्वक बोलावे अन्यथा आम्हीही बोलू शकतो, राऊत यांनी ज्यांचे नमक खाल्ले आहे त्यांची तरी जाण ठेवावी, अशी टीका सत्तार यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT