Schollership Exam News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शाळेच्या दिरंगाईमुळे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस मुकले

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरले, शुल्कही दिले पण परीक्षेची तारीखच विद्यार्थ्यांना कळविण्यात न आल्याचा खळबळजनक प्रकार मांजरोद (ता. शिरपूर) येथे घडला. संतप्त पालकांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह विविध स्तरांवर याबाबत तक्रारी करून संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर कारवाईची मागणी केली आहे.

मांजरोद येथे जनता शिक्षण प्रसारक संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय आहे. तेथील आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्याचे शुल्कही देण्यात आले. (About School bad work student missed scholarship exam Dhule News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

मात्र त्यानंतर मुख्याध्यापक, वर्गशिक्षकांनी परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबत कोणत्याच सूचना दिल्या नाहीत. परीक्षा होऊन गेल्यानंतर हा प्रकार उघड झाला. विद्यार्थी परीक्षेला मुकल्याची बाब पालकांपर्यंत गेली. त्यांनी शाळेत जाऊन जाब विचारला.

मात्र संबंधित समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, संस्थाध्यक्ष, गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी करून भोंगळ व दिरंगाईचा कारभार करणारे मुख्याध्यापक व वर्गशिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी राजेंद्र कुंभार, रवींद्र राजपत, महेश मोरे, सचिन पाटील, सुरेंद्र पाटील, संजय पाटील, पंकज जाधव या पालकांनी केली आहे.

"विद्यार्थ्यांचे अर्ज भरले, त्यानंतर त्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेचे वर्गही घेण्यात आले. ही जबाबदारी वर्गशिक्षक व इतरांना वाटून दिली होती. परीक्षेबाबत ऑनलाइन कळविण्यात येते. मात्र मला तसे नोटिफिकेशनच मिळाले नाही. इतर शिक्षकांना त्याबाबत माहिती असल्यास त्यांनी मला कळविले नाही. तांत्रिक चुकीमुळे हा प्रकार झाला असून, तो जाणूनबुजून केलेला नाही. संबंधितांना योग्य ते उत्तर दिले आहे."

-श्री. रत्नपारखी, मुख्याध्यापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : जर आयोगाने त्या घटनेनुसार असलेल्या संघटनात्मक रचनेची तपासणी केली असती, तर केवळ विधिमंडळातील बहुमताच्या आधारे हा वाद सोडवणे त्यांना कधीच शक्य झाले नसते - सिब्बल

Retired Cricketer Pension : सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग की सौरव गांगुली, कोणाला मिळते सर्वाधिक निवृत्तीवेतन?

पुरस्कार सोहळ्यात नाना पाटेकरांनी माधुरीची घेतली फिरकी, म्हणालेले... 'तुला खुप मिळाले पण...'

Zeeshan Siddique Death Threat : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर आमदार झिशान सिद्दीकींना धमकी 'वडिलांच्या हत्येच्या वेळी नशिबाने वाचलास, आता...'

Koyna Water Project : कोयनेचे पाणी मुंबईला नेण्यासाठी 40 हजार कोटींचा खर्च! वाशिष्ठीत वाया जाणारे पाणी मुंबईची भागवणार तहान? कोयनाच्या अवजलावर डोळा?

SCROLL FOR NEXT