उत्तर महाराष्ट्र

भरधाव डिझेलचा टँकर उलटताच उडी मारली आणि वाचवीला जीव

सुरज खलाणे

नेर : भरधाव वाहनाने हुलकावणी दिल्याने डिझेलने भरलेला टॅंकर उलटून सुमारे दहा हजार लिटर डिझेल रस्त्यावर सांडले गेले. हा अपघात नेरजवळील सुरत-नागपूर महामार्गावरील पांझरा नदीकाठावरील मोठ्या पुलाच्या वळणावर झाला.  

रविवारी रात्री अकराच्या सुमारास झालेल्या अपघातात सुदैवाने टॅंकर न पेटल्याने अनर्थ टळला. अहमदाबादहून औरंगाबादकडे (एमएच ४६, बीबी २५९०) डिझेलने भरलेला टॅंकर रविवारी रात्री जात असताना, समोरील वाहनाने हुलकावणी दिल्याने रात्री अकराला उलटला. टॅंकरमध्ये २५ हजार लिटर डिझेल होते.

उडी मारून वाचविला जीव

टॅंकर उलटल्याने त्यातील नऊ ते दहा हजार लिटर डिझेल जमिनीवर पडले. सुदैवाने जीवितहानी टळली. चालक व सहचालकाने प्रसंगावधान राखून शेतात उडी मारल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली.

महत्वाची बातमी- गडदाणी जंगलात दोन बिबट्यांची शिकार; लढविली होती शक्‍कल 

आवाज एकल्याने पोलिस धावले

अपघात झाल्याने टँकरचा उलटातच मोठा आवाज झाला. हा आवाज एकल्याने नेर दूरक्षेत्रातील पोलिस कर्मचारी राकेश मोरे तत्काळ घटनास्थळी मदतीसाठी धावले. जखमीला उपचारासाठी खासगी दवाखान्यात हलविले. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.  

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT