Both the buses came close to each other on the bypass road behind Taloda bus station. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : चालकांच्या प्रसंगावधानाने 2 बसचा अपघात टळला

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : शहराच्या सद्यःस्थितीत एकमेव बायपास रस्ता असलेल्या बसस्थानकामागील रस्त्यावरील मरीमाता चौकाच्या पुढे असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांत सोमवारी सकाळी एसटी व खासगी ट्रॅव्हल बसचा अपघात होता होता वाचला.

प्रसंगावधान राखून खड्ड्यात विटा टाकल्याने अत्यंत जिकिरीने दोन्ही बसच्या चालकांनी आपली वाहने कशीबशी काढली. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.(Accident of 2 buses was avoided due to initiative of drivers nandurbar news)

या बायपास रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे नेहमीच जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने संबंधित यंत्रणांनी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नंदुरबारकडे जाणाऱ्या रहदारीसाठी महत्त्वाचा असलेला शहरातील बसस्थानकामागील बायपास रस्ता खड्डेमय बनला आहे.

या रस्त्यावरून लहान-मोठ्या वाहनांतून सर्वच प्रकारची वाहतूक दिवस-रात्र सुरू असते. शहरातून जाणाऱ्या मेन रोडमार्गे नेहमीच वाहतूक कोंडी होते म्हणून या मार्गाला पसंती दिली जाते. मात्र महावितरण कार्यालयापासून सुरू होणारे खड्डे हातोडा रस्त्याला मार्ग पोचतो तरीदेखील संपत नाहीत. सर्वच यंत्रणांनी या रस्त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे शहरात बोलले जात आहे.

अशात नागरिकांना रस्ता आहे तसा वापरण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने दररोज शेकडो वाहने नंदुरबारकडे ये-जा करीत असतात. त्यात सोमवारी सकाळी आठच्या सुमारास नंदुरबारकडे जाणारी बस मरीमाता चौकात आली. त्याच वेळी नंदुरबारहून तळोद्याला येणारी खासगी ट्रॅव्हल्स बसदेखील तेथे पोचली.

रस्त्यावरील खड्डे चुकवत दोन्ही वाहने जात होती. त्याच वेळी एका मोठ्या खड्ड्यात खासगी बसचे चाक गेल्याने बस तिरकी झाली. शेवटी नागरिकांनी खड्ड्यात विटा टाकल्या व बसचा तोल सांभाळला गेला. त्यात ती बस बाजूला जाणाऱ्या एसटी बसवर आदळता आदळता वाचली.

...अन् प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला

या वेळी सकाळची बस असल्याने बस खचाखच भरली होती. मात्र दोन्ही वाहनचालकांनी प्रसंगावधान राखून वाहने थांबविली व खड्ड्यात विटांच्या भर केल्यानंतर वाहने मार्गस्थ झाली. त्यामुळे दोन्ही बसमधील प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

त्यात रहिवासी परिसर असल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे महावितरण केंद्रापासून तर थेट हातोडा रस्ता कॉर्नरपर्यंत रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.

रस्ता मंजूर, पण निविदाप्रक्रिया खोळंबली

शहरासाठी नंदुरबारकडे जाण्यासाठी नवीन बायपास रस्ता शहादा रस्ता ते कृषी उत्पन्न बाजार समितीपावेतो मंजूर झाला आहे. त्या रस्त्यासाठी अजून निविदाप्रक्रियाही झालेली नाही. त्या रस्त्याला पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन वर्षांहून अधिक कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे बांधकाम क्षेत्रातील जाणकार सांगतात. त्यामुळे तोपर्यंत नंदुरबारकडे जाणाऱ्या या एकमेव बायपास रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी आग्रही मागणी शहरवासीयांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati Visarjan Rath: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी आकर्षक रथ सज्ज

Ajit Pawar : अजितदादांचा नादच खुळा! पुण्याच्या गणपती मिरवणुकीत उपमुख्यमंत्र्यांनी वाजवला ढोल; कसबा गणपतीच्या पालखीलाही दिला खांदा

Latest Maharashtra News Updates : जुहू चौपाटीवर सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी येण्यास सुरुवात

Ganpati Visarjan 2025 Live Updates : जुहू चौपाटीवर सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी येण्यास सुरुवात

Miraj Ganpati Visarjan : मिरजेत गणरायाची बैलगाडीतून विर्सजन मिरवणूक, काय आहे वैशिष्ट्य जाणून घ्या

SCROLL FOR NEXT