Customer Service Center esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : ग्राहक सेवा केंद्रावर खातेदाराची फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

विजय बागल

निमगूळ (जि. धुळे) : दोंडाईचा येथील ग्राहक सेवा केंद्रावर (Customer Service Center) खातेदारांची (Account Holder) फसवणूक (Fraud) झाली असून, दोंडाईचा पोलिस ठाण्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेदारांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, ग्राहक सेवा केंद्रांमध्ये शेतकरी, अशिक्षित अशा खातेदारांचे फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. (Account holder fraud at customer service center Charges filed against 2 Dhule crime News)

कौतिक हरी माळी (वय ४५ रा.रामी ता . शिंदखेडा), यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की स्टेट बँक ऑफ इंडिया दोंडाईचा शाखेजवळ ग्राहक सेवक केंद्रात किरणकुमार हरीश्चंद्र पवार, शीतल गोसावी (रा. नंदुरबार चौफुली दोंडाईचा) यांच्याकडे बँकेचा व्यवहार करण्यासाठी ३ फेब्रुवारीला सात हजार रुपये भरण्यासाठी दिले होते. तशी पावती ग्राहक सेवा केंद्रातून मला मिळाली. दहा दिवसानंतर पासबुक प्रिंट केले असता भरलेली रक्कम जमा न झाल्याचे निदर्शनास आले. ग्राहक सेवा केंद्रातील शीतल गोसावी यांना यासंदर्भात जाब विचारला असता तुमचे पैसे ऑनलाइनमुळे अडकले असल्याचे सांगितले. तीन दिवसानंतर पुन्हा ग्राहक सेवा केंद्रात रकमेबाबत चौकशी करण्यासाठी गेलो तेव्हापासून केंद्र बंद होते.

संबंधित केंद्र चालक कोठारी पार्कजवळ भेटले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ग्राहक सेवा केंद्रात अनेक खातेदारांची फसवणूक झाली असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास दोंडाईचा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक दिनेश मोरे करत आहेत.

"दोंडाईचा शहरातील ग्राहक सेवा केंद्रावर खातेदारांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या खातेदारांनी या ग्राहक केंद्रावर व्यवहार केले असतील त्यांनी बँकेत जाऊन खात्याचा तपशील खात्री करून घ्यावा. व फसवणूक झाली असल्याचे निदर्शनास आल्यास दोंडाईचा पोलिसांशी संपर्क करावा."

- दिनेश मोरे, उपनिरीक्षक दोंडाईचा पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction: कॅमेरॉन ग्रीनसाठी ऐतिहासिक बोली! KKR अन् CSK मध्ये जोरदार रस्सीखेच; बनला सर्वात महागडा परदेशी खेळाडू

Hasan Mushrif : ‘आम्ही केलं; आता जबाबदारी तुमची’ शेंडा पार्क वैद्यकीय नगरीत मंत्री हसन मुश्रीफ यांचा ठाम संदेश

Virat-Anushka Meet Premanand Maharaj : प्रेमानंद महाराज यांनी विराट-अनुष्काला सांगितला रावणाच्या मृत्यूनंतरचा 'तो' प्रसंग, नेमकं काय म्हणाले? वाचा...

Mumbai News: गोराईत रडार, दहिसरमध्ये विकास; राज्य सरकारचा मोठा निर्णय, गृहनिर्माण प्रकल्पांना गती

IPL 2026 Auction : गडी पेटला... सर्फराज खानने २२ चेंडूंत चोपल्या ७३ धावा, ३३१.८२ चा स्ट्राईक रेट; सेलिब्रेशन तर भन्नाटच Video Viral

SCROLL FOR NEXT