team of police who arrested criminal
team of police who arrested criminal esakal
उत्तर महाराष्ट्र

अमळनेर कोर्टातून फरार आरोपीला धुळ्यात अटक

सकाळ वृत्तसेवा

धुळे : अमळनेर न्यायालयातून पोलिस रखवालीतून पसार झालेल्या आरोपीला धुळे तालुका पोलिसांनी बारा तासांच्या आतच जेरबंद केले. राजेश एकनाथ निकुंभ (रा. अमळनेर, जि.जळगाव) असे त्याचे नाव आहे. (Accused absconding from Amalner court arrested in Dhule Dhule Crime News)

पोलिसांनी निकुंभला शुक्रवारी अमळनेर न्यायालयात हजर केले होते. त्यादरम्यान त्याने पोलिस रखवालीतून पलायन केले. त्याच्यावर अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा आरोपी फागणे परिसरात आल्याची माहिती धुळे तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून आरोपी निकुंभला ताब्यात घेतले. पुढील कार्यवाहीसाठी त्याला अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर काळे, सुनील विंचुरकर, हवालदार प्रवीण पाटील, अविनाश गहीवड, धीरज सांगळे, कुणाल शिंगाणे, नितीन दिवसे, कांतिलाल शिरसाट, राकेश मोरे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT