Vendor pouring adulterated milk after inspection by authorities.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Milk Adulteration : दुधात भेसळ आढळलेल्या 8 दूध विक्रेत्यांवर कारवाई; मापात पाप असल्याने खटले

सकाळ वृत्तसेवा

Milk Adulteration : जिल्ह्यात दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीची स्थापन झाली आहे. या समितीच्या संयुक्तिक पथकाने दुधात पाण्याची भेसळ आढळलेल्या आठ विक्रेत्यांवर गुरुवारी (ता. १७) कारवाई केली. (Action against 8 milk sellers found adulterated in milk dhule news)

समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न-औषध प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन विभाग, वैधमापनशास्त्र विभाग, दुग्धव्यवसाय विभाग आदींच्या पथकातील अधिकारी संतोष कांबळे, डॉ. आर. एम. शिंदे, डॉ. अमित पाटील, संतोष दलाल, कृष्णा नेरकर, व्ही. व्ही. गरुड, प्रीतेश गोंधळी, हवालदार रवींद्र बेडसे, दूध तपासणी तंत्रज्ञ मनोज पाटील यांनी तपासणी केली.

त्यांनी शहरातील चाळीसगाव रोड, ८० फुटी रोड, वडजाई रोड, पारोळा रोड, गल्ली नंबर ४, साक्री रोड, जमनागिरी रोड, मालेगाव रोड तसेच फेरीवाले दूध विक्रेत्यांकडील दुधाची तपासणी स्वयंचलित उपकरणाद्वारे केली. कारवाईत एकूण १४ विक्रेत्यांकडील दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. पैकी आठ विक्रेत्यांच्या दुधात पाण्याची भेसळ आढळली. भेसळ आढळून आलेले सरासरी ७२५ लिटर दूध नष्ट करण्यात आले. त्यात गायीचे ९० लिटर, म्हशीचे ६३५ लिटर दूध आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वैधमापनशास्त्र विभागासह संयुक्त पथकाद्वारे दूध मोजण्याची मापे, इलेक्ट्रॉनिक तोलयंत्र मुद्रांकनाची पडताळणी करण्यात आली असता काही डेअरीतील मापे अवैध स्वरूपाची आढळली. त्यानुसार सहा दूध विक्रेत्यांवर खटले नोंदविण्यात आले आहेत. दूध विक्रेत्यांनी भेसळ रोखावी, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, असे आवाहन जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. अमित पाटील, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे यांनी केले.

या विक्रेत्यांवर झाली कारवाई

अमोल मिल्क सेंटर (पारोळा रोड चौफुली), बापू श्रीराम पाटील, आनंदा डोंगर धनगर (रा. वरखेडी), श्री वीर प्रभू महावीर दुग्धालय (ग.नं. ४) कुश दूध डेअरी (वडजाई रोड), शिवशंभू मिल्क ॲन्ड प्रॉडक्ट (शंभर फुटी रोड), लारा दुग्धालय (मालेगाव रोड, दसेरा मैदान), सुरेंद्र डेअरी (साक्री रोड).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT