crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : तपासणीत 28 जणांविरुद्ध 18 गुन्हे; ढाबे, हॉटेल्सवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे आठ डिसेंबरपासून जिल्ह्यातील मुंबई- आग्रा तसेच सुरत-नागपूर महामार्गांवरील ढाब्यांसह हॉटेल्सची अचानक तपासणी झाली. यात १८ ढाबे व हॉटेल्समध्ये गैरप्रकार आढळले.

याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात २८ संशयितांवर १८ गुन्हे दाखल झाले.()

जिल्ह्यातील अवैध व्यवसाय, गैरप्रकारांना आळा बसविण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कडक सूचना करण्यात आल्या आहे. या पार्श्वभूमीवर आठ डिसेंबरपासून स्थानिक पोलिसांच्या मदतीने राष्ट्रीय महामार्गांवरील हॉटेल व ढाब्यांची तपासणी झाली.

त्यानुसार आझादनगर पोलिस ठाण्याच्या अखत्यारित एक ढाबा, चाळीसगाव रोड पोलिस ठाणे हद्दीतील तीन, पश्चिम देवपूर पोलिस ठाणे हद्दीत चार ढाब्यांची तपासणी झाली. यात कुठेही अनुचित प्रकार आढळले नाहीत.

मोहाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन हॉटेलची तपासणी झाली. त्यात एका रेस्टॉरंटमध्ये अवैध दारु आढळली. याबाबत मोहाडी पोलिस ठाण्यात पाच संशयितांविरुद्ध तीन गुन्हे दाखल झाले. धुळे तालुका पोलिस ठाणे हद्दीत सहा ठिकाणी तपासणी झाली.

त्यात अवैध दारुसंबंधी सात गुन्हे दाखल झाले. शिरपूर तालुका पोलिस ठाणे हद्दीत दोन ठिकाणी अवैध मद्य आढळले. याबाबत दोन संशयितांवर गुन्हा नोंद झाला. साक्री पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक ठिकाणी कारवाई केली.

सोनगीर (ता. धुळे) पोलिस ठाणे हद्दीत पाच ढाब्यांची तपासणी झाली. यात एका ठिकाणी दारूबंदीची कारवाई केली. दोंडाईचा (ता. शिंदखेडा) पोलिस ठाणे हद्दीत चार हॉटेलची तपासणी झाली. मात्र, कुठेही गैरप्रकार आढळला नाही. थाळनेर (ता. शिरपूर) पोलिस ठाणे हद्दीत तीन ठिकाणी तपासणी झाली.

निजामपूर (ता. साक्री) पोलिस ठाणे हद्दीत चार ठिकाणी तपासणी झाली. पिंपळनेर (ता. साक्री) पोलिस ठाण्याच्या अखत्यारित चार ठिकाणी तपासणी झाली. अवैध दारूबाबत बारा जणांविरुद्ध चार गुन्हे दाखल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT