fertilizer esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Agriculture News : रासायनिक खतांची पुरेशी उपलब्धता; कृषी यंत्रणेची माहिती

सकाळ वृत्तसेवा

Dhule Agriculture News : येत्या खरीप हंगाम २०२३ साठी राज्यात पाच लाख ३३ हजार टन यूरिया, दोन लाख १५ हजार टन डीएपी, २९ हजार टन पोटॅश, आठ लाख ३९ हजार टन संयुक्त खते आणि पाच लाख १५ हजार टन सुपर फॉस्फेट, असे एकूण २१ लाख ३१ हजार टन खतांचा साठा उपलब्ध आहे.

हा साठा राज्याच्या खरीप हंगामातील गरजेच्या जवळपास ५० टक्के असून, खरीप हंगामात राज्याला ४३ लाख १३ हजार टन आणखी खत उपलब्ध होणार असून, धुळे जिल्ह्यात पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. (Adequate availability of chemical fertilizers Information on agricultural systems Dhule Agriculture News)

राज्यामध्ये खरिपासाठी भरपूर खत उपलब्ध असले तरी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला माती तपासणी अहवालाप्रमाणे खताची मात्रा दिली पाहिजे. प्रमाणापेक्षा अधिक खत दिले तर आपला खर्च तर वाढतोच परंतु सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पिकांना भासून उत्पादन घटते,

तर आवश्यक ते खत न मिळाल्यासही उत्पादन आणि गुणवत्ता घसरते. रासायनिक खतांसोबत कुजलेले शेणखत, कंपोस्ट, जैविक खत (बायोफर्टिलायझर्स), नॅनो यूरिया यांचाही वापर आवश्यकतेप्रमाणे करणे आवश्यक आहे.

कृषी विभागाने कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या मदतीने ‘कृषिक ॲप’ तयार करून घेतले आहे. या ॲपच्या मदतीने शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्यासाठी, माती तपासणी अहवालानुसार प्रत्येक पिकासाठी वेगवेगळ्या खतांची मात्रा आणि त्यासाठी लागणारी किंमत समजण्यास मदत होणार असून, याच ॲपमधून आपल्या तालुक्यातील प्रत्येक कृषी सेवा केंद्रात कोणकोणती खते उपलब्ध आहेत याची माहितीही मिळणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यामुळे खत खरेदी करणे सोपे होणार आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ‘कृषिक ॲप’चा वापर शेतकऱ्यांनी करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने पीएम प्रणाम ही योजना सुरू केली आहे.

शेतकऱ्यांनी खतांचा वापर मृदा तपासणीप्रमाणे केल्यामुळे एकूण खतांच्या अनुदानाच्या रकमेमध्ये बचत होणार असल्याने हे अनुदान केंद्र सरकारकडून राज्याच्या कृषी योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी माती तपासणी अहवालाप्रमाणे खतांचा समतोल वापर करावा, असे आवाहन कृषी यंत्रणेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT