Agriculture News esakal
उत्तर महाराष्ट्र

Agriculture News : शेतकऱ्यांना कवडीमोल किमतीत का विकावा लागतोय भाजीपाला?

सकाळ वृत्तसेवा

निमगूळ : सध्या भाजीपाल्याच्या किमतीत घसरण झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असून, भाजीपाला निघेपर्यंत लागणारा खर्चही निघणार नसल्याचे चित्र निर्माण झाल्याने काही शेतकऱ्यांनी पीक न घेता सर्रास यंत्र फिरवत पीकच घेतले नसून लागणारा खर्च निघणार नसल्याने शेतकरी वर्गाने हा निर्णय घेतला आहे.

बाजारपेठेत भाजीपाला कवडीमोल जात असल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला असून, त्यांना मेहनतीचे पैसे तरी मिळतील या हेतूने गावोगावी भाजीपाला विकत आहेत. रोज दोन-तीन गावांना ट्रॅक्टर घेऊन जातात. थंडीच्या दिवसात भूक-तहान विसरून बसस्थानक व चौकात उभे करून भाजीपाला विकावा लागत आहे. गावोगावी भाजीपाला विकण्याची वेळ आल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे. चिखलदा (ता. शहादा) येथील साहेबराव माळी या शेतकऱ्याने कोबी लावली होती.

हेही वाचा: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

ऐन पीक निघण्याच्या मार्गावर तीन रुपये किलोप्रमाणे शहादा मार्केटला जात असल्याने लागवड केल्यापासून तर कोबी निघेपर्यंत झालेला खर्च निघणार नव्हता. त्यामुळे स्वतः ट्रॅक्टर भरून सारंगखेडा, निमगूळ, दोंडाईचा या ठिकाणी दहा रुपये नगाप्रमाणे कोबी विकू लागले. यात नफा नाही पण कमीत कमी खर्च तरी निघेल या उद्देशाने पहाटे ट्रॅक्टर काढून स्वतः थंडीत सकाळी मिळेल त्या भावत विकत आहेत. त्यांच्याशी संपर्क केला असता काही शेतकऱ्यांनी शेतात रोटा फिरवत पीकच काढले नसल्याचे सांगितले. अशा स्थितीत मला काहीतरी खर्च तरी निघेल म्हणून विकत असल्याचे सांगितले. सद्यःस्थितीत भाजीपाल्याच्या भावात घसरण झाल्याने शेतकरी वर्ग हैराण असून, त्यांना भाजीपाला कवडीमोल विकावा लागत आहे.

पिकाच्या लागवडीपासून लागणारा खर्च फवारणी, मजुरी यानुसार भाजीपाल्याला भाव नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. मजूर मिळत नसल्याने काही वेळा स्वतःच शेतात राबून माल काढावा लागत आहे. तसेच लागणारा खर्च निघत नसल्याने करावे तरी काय, असा प्रश्न निर्माण होत असून, पीक निघण्याच्या वेळेस भावात वेळोवेळी घसरण होत असल्याचे चित्र आहे.

''आमचा खर्च निघत नाही. नफा मिळण्याचा विचार तरी कसा करावा? शासनाने शेतकऱ्यांचा विचार करावा.'' -साहेबराव माळी, शेतकरी, चिखलदा (ता. शहादा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT