Sixty three million scam in SRPF canteen at pune
Sixty three million scam in SRPF canteen at pune esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Agriculture Scam : जिल्हा कृषी यंत्रणेत ‘कुंपणच शेत खाते तेव्हा... नातेवाइकांआडून थाटला व्यवसाय!

निखिल सूर्यवंशी

Dhule Agriculture Scam : एकिकडे बनावट खतसाठा प्रकरणी कृषी सहसंचालकांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात तपासणी मोहीम सुरू असताना जिल्ह्यातील कृषी यंत्रणेत ‘कुंपणच शेत कसे खाते’ याचा भांडाफोड होण्यास सुरवात झाली आहे.

काही कृषी अधिकाऱ्यांनी नातेवाइकांच्या नावाखाली कृषी सेवा केंद्रे, ‘एमआयडीसी’त कंपन्याच थाटल्याची धक्कादायक माहिती उजेडात येत आहे.

तेच अधिकारी आणि त्यांच्याकरवीच पडद्याआडून कृषी निविष्ठांचा व्यवसाय सुरू असल्याने जिल्ह्यातील या क्षेत्रात अस्वस्थता पसरली आहे. संबंधितांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत असल्याचे चर्चा घडू लागली आहे. (Agriculture officials set up companies in names of relatives in Krishi Seva Kendra MIDC Dhule Agriculture Scam news)

बनावट खतसाठा प्रकरणामुळे कृषी यंत्रणेतील काही गंभीर बाबींना आता सार्वत्रिक चर्चेतून वाचा फुटू लागली आहे. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण शाखेच्या परवानगीशिवाय एकही कृषी निविष्ठा विक्री करता येत नाही. असे असताना बनावट खतसाठा, बी- बियाण्यांचा जिल्ह्यात पुरवठा होतो कसा, असा शेतकऱ्यांचा प्रश्‍न आहे.

आक्रोशाकडे दुर्लक्ष

काही कृषी अधिकाऱ्यांनी तर अधिकाराच्या दुरुपयोगातून नातेवाइकांच्या आडून कंपन्या स्थापन करणे, कृषिसेवा केंद्र चालविण्याचा उद्योग सुरू केला आहे. राज्यासह जिल्ह्यात ठिकठिकाणी असे प्रकार घडत असल्याचे बोलले जाते. शिवाय काही कृषी अधिकारी तर अशा काही व्यवसायात छुपे भागीदार असल्याचीही चर्चा लपून राहिलेली नाही.

शासकीय सेवा आणि संरक्षण, शिवाय गलेलठ्ठ वेतन असताना त्या अधिकाऱ्यांतर्फे नातेवाइकांच्या आडून बी-बियाणे, कीटकनाशके, खतांचा व्यवसाय राजरोस चालविला जात आहे. याप्रश्‍नी जिल्ह्यातून आक्रोश होत असताना तो कृषिमंत्री, कृषी आयुक्त, राज्य गुणवत्ता नियंत्रण विभाग, कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कानी कसा पडत नाही, हा संशोधनाचा भाग ठरत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दाद कुणाकडे मागणार?

काही कृषी अधिकारीच छुप्या पद्धतीने कृषी निविष्ठांचा व्यवसाय करीत असल्याने त्याचा या क्षेत्रातील मार्केटवर विपरीत परिणाम होत असल्याची कुजबूज सुरू झाली आहे. अशा प्रकारांमुळे उदरनिर्वाहासाठी उधारीसह कामगार व इतर अनेक समस्यांना तोंड देत उभे राहणाऱ्या व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

धुळे तालुक्यातील बोरीपट्टा, साक्री, नरडाणा एमआयडीसी आदी काही भागांत काही कृषी अधिकाऱ्यांनी नातेवाइकांच्या आडून बी- बियाणे, कीटकनाशके, खत विक्रीची केंद्रे आणि कंपन्या स्थापन केल्या आहेत. यातून ‘कुंपणच शेत खात असेल’ तर सर्वसामान्य व्यावसायिकांनी करायचे काय, कुणाकडे दाद मागायची, असा यक्षप्रश्‍न संबंधितांपुढे उभा ठाकला आहे. याविषयी जिल्ह्यात चर्चा होत असताना वरिष्ठ कृषी अधिकारी गप्प कसे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

आरआर बीटीच्या प्रकरणाचे काय?

शिरपूर येथील एका डिस्ट्रिब्यूटरकडून गेल्या वर्षी विनानोंदीतील आरआर बीटी बियाण्यांची विक्री झाली. मात्र, त्याविषयी अधिक चर्चा होऊ नये म्हणून मामला रफादफा करण्यात आल्याचे समोर येत आहे.

त्यात अनेकांनी हात ओले केल्याची अर्थपूर्ण चर्चा जिल्ह्यात घडू लागली आहे. जिल्ह्यात उजळ माथ्याने विविध मार्गाने शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार घडत असताना वरिष्ठ व स्थानिक कृषी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कसे होते, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT