Pipeline on Akkalpada Water Supply Scheme
Pipeline on Akkalpada Water Supply Scheme  esakal
उत्तर महाराष्ट्र

Akkalpada Water Supply Scheme : धुळेकरांना लवकरच दिवसाआड पाणी

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलवरील पाचपैकी एका पंपाची चाचणी यशस्वी झाली. दोन-तीन दिवसांत उर्वरित पंपाचीही चाचणी होईल. (Akkalpada Water Supply Scheme Dhule people soon get water after one day gap dhule news)

त्यामुळे येत्या तीन-चार आठवड्यांत योजना कार्यान्वित होऊन धुळेकरांना दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होईल, असा विश्‍वास खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत धुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर व सध्या अंतिम टप्प्यात काम आलेल्या अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेची महाराष्ट्रदिनी (१ मे) खासदार डॉ. भामरे, महापौर प्रतिभा चौधरी यांच्यासह इतर पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसेच जॅकवेलवरील पाचपैकी एका पंपाची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली.

माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, आयुक्त देवीदास टेकाळे, उपमहापौर नागसेन बोरसे, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, सभागृहनेते राजेश पवार, महिला व बालकल्याण उपसभापती विमल पाटील, माजी महापौर प्रदीप कर्पे, स्थायीचे माजी सभापती शीतल नवले, नगरसेविका वंदना थोरात, नगरसेवक हिरामण गवळी, उपायुक्त विजय सनेर, शहर अभियंता कैलास शिंदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता धोत्रे, मनपाचे सहाय्यक अभियंता एन. के. बागूल, चंद्रकांत उगले आदी उपस्थित होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पंपाच्या चाचणीनंतर खासदार डॉ. भामरे म्हणाले, की महापालिका निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांनी धुळेकरांना नियमित पाणीपुरवठ्याचा शब्द दिला होता. त्यांच्या प्रयत्नांवर अक्कलपाडा योजनेला सुरवात झाली. या योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. लवकरच तांत्रिक अडचणीवर मात करून धुळे शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल.

योजनेवरील जॅकवेलमधून पाणी उचलण्यासाठी पाच पंप बसविण्यात आले आहेत. त्यातील एका पंपाची तात्पुरत्या स्वरूपात चाचणी घेतली. लवकरच वीज कंपनीमार्फत आवश्यक त्या क्षमतेने वीजपुरवठा होणार असून, जॅकवेल ते वॉटर ट्रीटमेंट प्लांटदरम्यान पाणीपुरवठा सुरू होईल. त्यानंतर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी वितरणाबाबत कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे येत्या तीन ते चार आठवड्यात धुळेकरांना दिवसाआड पाणीपुरवठा होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT