Rickshaw
Rickshaw 
उत्तर महाराष्ट्र

रिक्षाच बनली रुग्णवाहिका

सकाळ वृत्तसेवा

देवळालीगाव - रेल्वेस्थानकात चक्‍कर येऊन पडलेला युवक तळमळत असताना माणुसकी हरपलेल्या प्रवाशांनी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे एका प्रवाशाच्या लक्षात आले. त्याने क्षणाचाही विलंब न करता थेट टीसींशी संपर्क साधून व्यवस्था केली. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका ‘नॉट रिचेबल’ दाखवत असल्याने रिक्षावाल्याची मदत घेत त्याने युवकाला जीवदान दिले.

मंगळवारी (ता. ४) दुपारी सव्वाअकराच्या सुमारास नाशिक रोड रेल्वेस्थानकातील फलाट तीनवर गाडी नंबर (१२१४२) अप पाटलीपुत्र एक्‍स्प्रेस थांबल्यानंतर गाडीतून उतरणाऱ्यांची व चढणाऱ्यांची एकच धावपळ उडाली. त्याचवेळी फलाट तीनवर उभ्या असलेल्या एका प्रवाशाला अचानक चक्‍कर आल्याने तो खाली कोसळला. तो तळमळत असताना त्याच्याजवळून अनेक प्रवासी ये-जा करीत होते. परंतु त्याच्या मदतीसाठी कुणीच पुढे येत नसल्याचे अजय पाटील नावाच्या एका जागृत प्रवाशाने क्षणाचाही विलंब न करता याबाबतची माहीती टीसी कार्यालयात दिली. त्यावेळी ड्यूटीवर असलेले टीसी सुरेश वाघ व दत्तात्रय सरोदे यांनी उपव्यवस्थापक जितेंद्र झा यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.

आजारी प्रवाशाला सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने व्हिलचेअरवरून स्थानकाबाहेर आणले; परंतु १०८ रुग्णवाहिकेचा संपर्क होत नसल्याने अखेर रेल्वेस्थानकातील रिक्षाचालक अरुण गरुड यांनी त्याला तत्काळ रिक्षातून बिटको रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रवाशाची तब्येत गंभीर असल्याने शिवाय त्याच्या सोबत कुणीच नसल्याने बिटको रुग्णालयातील डॉक्‍टरांनी त्याला खासगी रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याची माहिती स्थानक उपव्यवस्थापकांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेस सत्तेत आल्यास मोफत उपचार बंद होतील - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT