Anandacha Shidha esakal
उत्तर महाराष्ट्र

Anandacha Shidha : 3 लाख शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा होणार वितरित

सकाळ वृत्तसेवा

धुळे : राज्य शासनाने दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय घोषित केला. गुढीपाडवा सण आनंदाचा शिधाविनाच गेला. (anandacha shida will be distributed to 3 lakh ration card holders dhule news)

दरम्यान, आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत आनंदाचा शिधा वितरित होईल, अशी माहिती पुरवठा विभागातील सूत्रांकडून मिळाली. जिल्ह्यात सुमारे तीन लाख शिधापत्रिकाधारकांना त्याचा लाभ अपेक्षित आहे.

आनंदाचा शिधासाठी जिल्ह्याकडून मागणी नोंदविली गेली आहे. या आनंदाच्या शिधामध्ये एकाच वेळी चारही वस्तू येणार आहेत. त्यानंतरच किट वितरित केले जातील. डॉ. आंबेडकर जयंतीपूर्वी जिल्ह्यात आनंदाच्या शिध्याचे वाटप पूर्ण होईल, असे सांगितले जाते.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

जिल्ह्यात एकूण दोन लाख ९८ हजार ८३५ शिधापत्रिकाधारकांना त्याचा लाभ अपेक्षित आहे. यात अंत्योदय योजनेचे ७४ हजार ७३६, तर प्राधान्य कुटुंब योजनेतील दोन लाख २४ हजार १८० शिधापत्रिकाधारकांचा समावेश आहे. या लाभार्थ्यांना शंभर रुपयांत एक किलो साखर, तेल, हरभराडाळ व रवा असा आनंदाचा शिधा वितरित होईल.

मागणीनुसार आनंदाचा शिध्याचे किट वाटप केले जाईल. जिल्ह्यासाठी मागणीही नोंदविण्यात आली. मात्र, कालावधी कमी, त्यातच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नियोजन कोलमडले. परिणामी शिधापत्रिकाधारकांचा गुढीपाडवा गोड होऊ शकला नाही. आता डॉ. आंबेडकर जयंतीपूर्वी आनंदाचा शिधा वितरित होईल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: दिवसभरात काय घडलं? वाचा सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT