National President Anil Ghanwat guiding the seminar of Swatantra Bharat Party. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : सरकारच्या धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारी : अनिल घनवट

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : धुळे जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्ती, तसेच शेतमालाचे भाव पाडणाऱ्या सरकारच्या धोरणामुळे कर्जबाजारी झाले आहेत. कोणत्याही पक्षाची शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करण्याची इच्छा नाही.

शेतकऱ्यांचे व देशाचे दारिद्र्य हटविण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष हा एकच पर्याय आहे, असे मत स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी व्यक्त केले.(Anil Ghanwat statement of Farmers are indebted because of government policies dhule news)

धुळे शहरातील शिक्षकेत्तर कर्मचारी भवनच्या सभागृहात पक्षाचे चर्चासत्र झाले. त्या वेळी घनवट मार्गदर्शन करीत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमा नरोडे व शेतकरी संघटनेचे विभागप्रमुख शशिकांत भदाणे उपस्थित होते. अध्यक्ष घनवट म्हणाले, की देशात व राज्यात राजकारणाची पातळी ढासळली आहे.

कोणत्याही पक्षाला विचारधारा राहिली नाही. सत्तेत राहण्यासाठी पक्ष फोडणे व गुन्हेगारांना पाठीशी घातले जात आहे. भ्रष्टाचाराचा अतिरेक झाला आहे. एकही प्रस्थापित कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करू शकत नाही.

देशात कायद्याचे राज्य पुनर्स्थापित करण्यासाठी, शरद जोशींनी निर्माण केलेला स्वतंत्र भारत पक्ष बळकट करणे गरजेचे आहे. संपूर्ण वन्यप्राण्यांचा बंदोबस्त, सुरळीत वीजपुरवठा व कर्जमुक्तीसाठी जानेवारीत राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान, या चर्चासत्राचे संयोजन शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागप्रमुख शशिकांत भदाणे, भगवान पाटील, नीलकंठ पवार, रणजितसिंह राऊळ, निंबा पाटील, शांतुभाई पटेल, आत्माराम पाटील, पी. डी. देवरे, रवींद्र वाणी, प्रा. बी. पी. शिरसाठ, राजेंद्र कोरडकर, राहुल गवळे, सरपंच सुजणे, रामदास जगताप, प्रमोद पाटील, अविनाश पाटील, भगवान पाटील, नानाजी शेलकर आदींनी केले.

दरम्यान, या वेळी धुळे जिल्हा स्वतंत्र भारत पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी गुलाबसिंग रघुवंशी, तर शेतकरी संघटनेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी पी. डी. देवरे यांची निवड झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Fire Incident Video : निवडणुकीच्या विजय जल्लोषादरम्यान मोठी आग; दोन नवनिर्वाचित नगरसेवक भाजले, अनेक लोक जखमी, जेजूरीतील धक्कादायक Video समोर...

Muncher Municipal Result:'मंचर नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या राजश्री गांजाळे'; आमदार शरद सोनवणेंनी फुगडीतून व्यक्त केला आनंद..

राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष! एम.कॉम.चे शिक्षण घेणारी २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे मोहोळच्या नगराध्यक्षा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या शुभेच्छा

Marathwada Sahitya Sammelan: ४५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी फ. म. शहाजिंदे; बीड जिल्ह्यात हाेणार संमेलन!

Nagaradhyaksha Election Poll Results : नगराध्यपदाच्या निकालानंतर अजित पवार गटाच्या नेत्याने टोचले स्वत:च्या पक्षाचे कान; म्हणाले, आत्मचिंतनाची गरज!

SCROLL FOR NEXT