Guardian Minister Anil Patil discussing with Medha Patkar at the protest site. esakal
उत्तर महाराष्ट्र

Anil Patil News: शेतकऱ्यांच्या उसाचा एकही पैसा बुडू देणार नाही : अनिल पाटील

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा आहे. एकही पैसा बुडू देणार नाही. त्यासाठी लवकरच कारखानदार, शेतकरी व साखर आयुक्त यांची बैठक घेऊन तोडगा काढू, असे आश्‍वासन पालकमंत्री अनिल पाटील यांनी आंदोलकांना दिले. (Anil Patil statement Farmers sugarcane will not be allowed to sink nandurbar political)

लोणखेडा येथील सातपुडा साखर कारखाना सध्या नागाईदेवी साखर कारखान्यातर्फे चालविला जात आहे. मात्र कारखान्याने शेतकऱ्यांचे उसाचे पेमेंट थकविले आहे. त्यासाठी शेवटी सोमवारी (ता. १६) ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन पुकारले होते.

पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी आंदोलनस्थळी जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. या वेळी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नर्मदा बचावच्या नेत्या मेधा पाटकर, माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी आदी उपस्थित होते.

त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतकऱ्यांची थकीत रक्कम व आतापर्यंत कारखानदारांकडून मिळालेली आश्‍वासने आणि झालेली निराशा हा सर्व घटनाक्रम कथन केला. त्यानंतर सर्व ऐकून घेत पालकमंत्री पाटील यांनी आपण शेतकऱ्यांवर कदापि अन्याय होऊ देणार नाही.

पालकमंत्री या नात्याने मी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन. त्यासाठी लवकरच साखर आयुक्त, कारखानदार व शेतकरी यांची बैठक घेऊन त्यात सविस्तर चर्चा करू, तसेच शेतकऱ्यांची थकीत रक्कम काढण्यासाठी काय करता येईल ते करू, शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन केले. त्यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.

या वेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT