Appeal of District Village Industries Officers to submit applications for honey Kendra Yojana Nandurbar News sakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : मध केंद्र योजनेसाठी अर्ज सादर करावेत; जिल्हा ग्रामोद्योग अधिकार्यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजनेसाठी पात्र व्यक्ती आणि संस्थांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी विजय चाटी यांनी केले. (Appeal of District Village Industries Officers to submit applications for honey Kendra Yojana Nandurbar News)

मध केंद्र योजना सुरू करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदान स्वरूपात देण्यात येईल व ५० टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल. शासनाच्या हमीभावाने मध खरेदी करण्यासोबत मधमाश्या संरक्षक व संवर्धन याबाबत मोफत प्रशिक्षण व जनजागृती मंडळामार्फत करण्यात येते. वैयक्तिक मधपाळ प्रशिक्षण घेण्यासाठी अर्जदार साक्षर असावा आणि वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल.

केंद्रचालक प्रगति‍शील मधपाळ योजनेसाठी मधपाळ संस्था, व्यक्तींना प्रशिक्षण घेण्यासाठी अर्जदार किमान दहावी पास असावा आणि वय २१ वर्षांपेक्षा जास्त असावे. अर्जदार व्यक्तींच्या नावे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेतजमीन किंवा भाडेतत्त्वावर शेतजमीन असावी. लाभार्थ्यांकडे मधमाश्यापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

केंद्रचालक मधपाळ प्रशिक्षण संस्थेसाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे मालकीची किंवा दहा वर्षांसाठी भाडेत्त्वावर एक एकर शेतजमीन असावी. प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी संस्थेच्या नावे अथवा भाडेतत्त्वावर हजार चौरसफूट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाश्यापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावेत.

लाभार्थी निवडप्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे आणि मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी संबंधितांना प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल. योजनेच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, दुसरा मजला रूम नं. २२२, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, टोकरतलाव रोड, नंदुरबार दूरध्वनी क्रमांक ०२५६४-२१००५३ येथे संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आज काँग्रेस करणार महात्मा गांधीच्या पुतळ्याचे रक्षण

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT