Farmer Kailas Rokde while filling sacks with prunes into boxes. Blooming amla and bore in the second photo.
Farmer Kailas Rokde while filling sacks with prunes into boxes. Blooming amla and bore in the second photo. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : न्याहळोदची बोरे दिल्ली, कोलकत्यात! ॲप्पल बोरांद्वारे शोधला उन्नतीचा मार्ग

विशाल रायते

न्याहळोद (जि. धुळे) : चिकाटी, जिद्द, योग्य नियोजन आणि कष्टातून स्वप्नाला मूर्त स्वरूपात उतरविण्याची किमया साधलेले येथील शेतकरी कैलास रोकडे यांनी ॲप्पल बोरची शेती फुलविली आहे.

त्यांच्या ॲप्पल बोरांनी दिल्ली, कोलकत्याची बाजारपेठ काबीज केली असून, भरघोस उत्पन्नातून त्यांनी उन्नतीचा मार्ग शोधला आहे. या माध्यमातून शेतकरी वर्गापुढे चांगला आदर्श निर्माण केला आहे. (apple bora from dhule famous in Delhi Kolkata way to progress discovered Dhule New)

कोरडवाहू न्याहळोदला पावसाळ्यातच पाणी मिळते. या स्थितीत ठिबक सिंचनाच्या माध्यमातून शेतकरी रोकडे यांच्यासह तीन ते चार शेतकऱ्यांनी फळबाग फुलविण्याला पसंती दिली आहे. यात शेतकरी रोकडे यांनी पूर्णतः फळबागेची म्हणजेच ॲप्पल बोराची शेती आहे.

इतर शेतकरी बोरे व लिंबाचे उत्पादन घेतात. येथील ॲप्पल बोरांनी कोलकता व दिल्लीची बाजारपेठ काबीज केल्याने शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे फळबाग फायद्याची ठरत असल्याचे शेतकरी आवर्जून सांगतात.

शोधला उन्नतीचा मार्ग

कडधान्य व इतर पिकांचा खर्च व मजुरीदेखील जास्त लागते. त्यामुळे उत्पन्न कमी व श्रम जास्त असल्यामुळे फळबाग लागवडीतून भरघोस उत्पन्न घेता येऊ शकते हे शेतकरी रोकडे यांच्या अनुभवाने दिसून येते.

त्यांनी सात एकरात ॲप्पल बोराच्या शेतीतून १४ ते १५ लाखांचे, तर दोन एकरांत पंधरा बाय पंधरा दीडशे आवळा झाडांच्या लागवडीतून सरासरी अडीच ते तीन लाखांपर्यंत उत्पन्न घेतले आहे.

तसेच त्यांनी नव्याने गोल्डन व्हरायटी सीताफळाची लागवड केली आहे. त्यातून एक-दीड लाखापर्यंतचे उत्पन्न ते घेत आहेत. धाडस दाखवीत त्यांनी या फळशेतीतून उन्नतीचा मार्ग शोधला आहे.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

बोरांना चांगला दर

योग्य नियोजन, वेळोवेळी निगा, खत, फवारणीसह छाटणी केल्यावर आठ ते नऊ महिन्यांत फळे येण्यास सुरवात होते. पहिल्या वर्षी प्रत्येक झाडानुसार किमान ३० ते ५० किलो, तर दुसऱ्या वर्षी प्रत्येक झाडाला ८० ते १२० किलो बोरांचे उत्पादन होते. देशी बोरांपेक्षा ॲप्पल बोरांचे वजन सरासरी ६० ते २०० ग्रॅमपर्यंत भरते. या जातीचे एक झाड सुमारे २० वर्षे जगते. ती कायम हिरवीगार राहतात.

ॲप्प‍ल बोरांना स्थानिक बाजारपेठेत प्रतिकिलो सरासरी १५ ते १६ रुपयांपर्यंत, तर गेल्या वर्षी दिल्ली बाजारपेठेत हा दर सरासरी २० ते ३० रुपये होता.

देवभाने येथून बाजारपेठेत

बोरांची छाटणी, नंतर खोक्यांमध्ये पॅक केल्यावर देवभाने (ता. धुळे) फाट्यावर व्यापारी बोरे खरेदी करतात. फेब्रुवारीच्या मध्यापासून एप्रिलअखेरपर्यंत फळे काढली जातात. वातावरण बदलामुळे उत्पन्न कमी-अधिक होत असते. त्या पद्धतीने फळे बाजारात येतात. त्यांना मागणीदेखील खूप आहे.

"शेती नेहमीच तोट्याची असे म्हटले जात असताना फळबाग फुलविल्याने मला भरघोस उत्पन्न मिळणे शक्य होत आहे. योग्य नियोजन, चिकाटी, जिद्द, परिश्रम या चतुःसूत्रीतून अशी शेती केल्यास परवडते." -कैलास रोकडे, शेतकरी, न्याहळोद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT