crop
crop  crop insurance
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शेतकऱ्यांसाठी पीक प्रात्यक्षिक योजना; महाडीबीटी पोर्टलवर करा नोंदणी

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : राष्ट्रीय कृषी विकास योजना २०२३- २०२४ अंतर्गत महाराष्ट्र मिलेट मिशन व राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अन्नधान्ये पिकांतर्गत खरीप हंगामामध्ये पीक प्रात्यक्षिक व प्रमाणित बियाणे वितरण या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांकडून महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. (Applications are invited from interested farmers for crop demonstration through MahaDBT system dhule news)

इच्छुक शेतकऱ्यांनी आपले सरकार महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून https://mahadbt.mabarasbrea.gov.in/farmer/scheme या संकेतस्थळावर लॉगीन करून अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. एम. तडवी यांनी पत्रकान्वये केले आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनांतर्गत महाराष्ट्र मिलेट मिशन व राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अन्नधान्ये पिके कार्यक्रम तूर, मूग, उडीद या कडधान्यासाठी, मका या भरड धान्यासाठी, ज्वारी, बाजरी, नाचणी पौष्टिक तृणधान्यासाठी तर महाराष्ट्र मिलेट मिशन पीक प्रात्यक्षिक ज्वारी, बाजरी, नाचणी या पिकांसाठी राहील.

अनुदानासाठी मर्यादा

पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सुक्ष्म मूलद्रव्ये, भुसुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधित पिकाच्या प्रकारानुसार २ ते ४ हजार रुपये प्रती एकर मर्यादित अनुदान अदा करण्यात येणार आहे. यासाठी कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञांचे सल्ल्याने जिल्हानिहाय निविष्ठा पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शेतकरी समूह नोंदणी

एकाच गावातील २५ शेतकऱ्यांनी १० हेक्टर क्षेत्रावर समूहाने नोंदणी केल्यावरच ऑनलाइन सोडतमध्ये संबंधित गावाचे नाव समाविष्ट होणार असल्याने एकाच गावातील समूहाने/गटाने नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा.

अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, शेतकऱ्यांची निवड ऑनलाइन लॉटरी पद्धतीने होणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. तडवी यांनी कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT