1 crore worth stuff seized from rajendra bamb house
1 crore worth stuff seized from rajendra bamb house esakal
उत्तर महाराष्ट्र

अवैध सावकार बंबचा कारनामा; धुळ्यातील लॉकरमध्ये 78 लाख कॅश

निखील सुर्यवंशी

धुळे : अवैध सावकार (Illegal moneylender) व एलआयसी एजंट राजेंद्र बंब याच्या देवपूरमधील पतसंस्थेच्या लॉकरमध्ये दडवलेली तब्बल ७७ लाखांची रोकड, साडेसात लाखांचे सोने, पाचशेवर कोरे धनादेश, अडीचशे कोरे स्टँप पेपर, इतर व्यक्तींच्या नावे बेनामी सुमारे वीस लाखांच्या निधीतील २६० ठेव पावत्या तपासात आढळल्या. पोलिसांनी हा सुमारे एक कोटींचा मुद्देमाल गुरुवारी (ता. २३) जप्त केला. (around 1 crore stuff Illegal moneylender Rajendra bamb locker seized dhule crime news)

पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्यादी जयेश दुसाने याने अवैध सावकार राजेंद्र बंब याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यात त्याचा भाऊ संजय बंब, नोकर चंद्रशेखर गोसावी सहआरोपी आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून संजय बंब फरारी आहे. त्याच्या शोधासाठी पथके कार्यरत आहेत. त्याच्या देवपूरमधील व राजेंद्र बंब हाताळत असलेल्या श्रीराम पतसंस्थेतील लॉकरची तपासणी करण्यात आली. त्यात ७७ लाख ९३ हजार रोख, १४९ ग्रॅम व साडेसात लाखांचे सोने, कर्जदारांकडून केलेल्या सौदा पावत्यांपोटी पाचशेवर कोरे धनादेश, २४४ हून अधिक कोरे स्टँप आणि एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांच्या नावे, अशा अनेक मिळून २६० ठेव पावत्या (एफडी) जप्त करण्यात आल्या.

पुरावे उपयुक्त ठरतील

स्टँप पेपर, कोऱ्या धनादेशावर फक्त पीडित कर्जदारांच्या स्वाक्षरी आहेत. कुठल्याही रक्कमांची नोंद नाही. हा सर्व बेकायदेशीर प्रकार आहे. असे पुरावे न्यायालयीन कामकाजावेळी उपयुक्त ठरतील. अवैध सावकार बंब याने ब्लॅक मनी ठेव पावत्यांच्या मार्गाने वळविल्याचे समोर येत आहे. ज्या व्यक्तींच्या वा एकाच कुटुंबातील काही सदस्यांच्या नावे केलेल्या ठेव पावत्या संबंधितांना माहीत नसाव्यात. आतापर्यंत बंबच्या विविध लॉकरमध्ये आढळलेल्या ठेव पावत्या व सौदा पावत्या, गहाण खते, इतर कागदपत्रे कायद्याच्या चौकटीतून पीडित कर्जदारांना देण्याचा प्रयत्न असेल.

जप्त मुद्देमाल सरकारजमा

बंब याच्या मालमत्ता व त्याने आणखी कुठे पैसे, कागदपत्रे दडविली आहेत, त्याचा तपास केला जात आहे. पुण्यापर्यंत तपासाची दिशा गेली आहे. त्याने प्राप्तीकर विभागाकडे पाच ते दहा वर्षांत किती रिटर्नस्‌ भरले आहेत याचाही तपास केला जात आहे. बंब याच्याकडे इतका पैसा आला कुठून हाही तपासाचा भाग ठरला आहे. अनेक कर्जदारांनी बंब याच्याकडून कर्ज घेतले, त्याची परतफेड केली आणि त्याने मूळ कागदपत्रे दिली नाहीत, दागिने परत दिले नाहीत, ते कायद्याच्या चौकटीतून दिली जातील. त्यासाठी संबंधित नागरिकांना पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे अर्ज करावा लागेल.

बंब तपासात सहकार्य करीत नाही. त्यामुळे त्याच्याकडे आतापर्यंत सापडलेला पैसा, दागिने व अन्य मुद्देमाल सरकारजमा केला जाणार आहे, असेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात कारवाई अधीक्षक पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक ईश्‍वर कातकाडे यांच्या सहकार्याने आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत बंडाळे, उपनिरीक्षक हेमंत बेंडाळे, हिरालाल ठाकरे, हवालदार गयासुद्दीन शेख, भूषण जगताप, रवींद्र शिंपी, मनोज बाविस्कर, राजू गिते, सहकार विभागाचे अधिकारी मनोज चौधरी, राजेंद्र विरकर, शासनमान्य मूल्यांकनकर्ता प्रणव बहाळकर करीत आहेत.

बंबकडे सापडलेले एकूण घबाड...

-खरेदी खत : २१७

-सौदा पावत्या : १८८

-ठेव पावत्या : २ हजार ९७१

-रोकड : १२ कोटी २४ लाख १७ हजार

-सोने मूल्य : ६ कोटी ९ लाख ५५ हजार

-चांदी मूल्य : ५ लाख २७ हजार ४११

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT