Arunbhai-Gujarati
Arunbhai-Gujarati 
उत्तर महाराष्ट्र

ॲड. निकमांशी दोन दिवसांत चर्चा करणार - अरुणभाई गुजराथी

सकाळवृत्तसेवा

जळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवावी यासाठी आपण राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी दोन दिवसांत चर्चा करणार आहोत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुणभाई गुजराथी यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील झालेल्या बैठकीत जळगाव लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीसाठी राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा करण्यात आली. तसेच त्यांची सहमती घेण्यासाठी विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. 

याबाबत अरुणभाई गुजराथी यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, पक्षाच्या बैठकीत त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यात आली. पक्षाच्या नेत्यांनी आपल्यावर त्यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी दिलेली आहे. त्यानुसार आपण मुंबईहून जळगावला आल्यानंतर उद्या (ता. ६) किंवा सोमवारी (ता. ७)  त्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत.

आपली उमेदवारी प्राथमिक 
रावेर मतदार संघासाठी अरुणभाई गुजराथी याच्या नावाची चर्चा झाली आहे. त्याबाबत ते म्हणाले, आपली उमेदवारी निश्‍चित नाही, ती केवळ प्राथमिक घोषणा आहे. याबाबत अंतिम निर्णय पक्षातर्फेच घेण्यात येईल. मात्र पक्षाने उमेदवारी दिली, तर आपण लढणार आहोत.

..तर रावेरची जागा काँग्रेसलाही
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपात रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सोडण्यात आल्याचा कांगावा काँग्रेसतर्फे करण्यात येत आहे. त्याबाबत मत विचारले असता गुजराथी म्हणाले, की राज्यातील आठ मतदारसंघांबाबत अद्यापही चर्चा सुरू आहे. त्याबाबत पक्षाचे नेते शरद पवार निर्णय घेत आहेत. वरीष्ठस्तरावर झालेल्या चर्चेत जर रावेरची जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय झाला, तर ती जागा काँग्रेसलाही आम्ही सोडणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT