Assistant Police Inspector Rajan More esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : ‘त्यांनी’ 20 फूट खोलीतून मृतदेह बाहेर काढला!

सकाळ वृत्तसेवा

शहादा (जि. नंदुरबार) : एरवी पाण्यात बुडालेल्या मृतदेहाला शोधून बाहेर काढण्यासाठी गोताखोर अथवा पट्टीच्या पोहणाऱ्यांची मदत घेतली जाते. सहसा पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचारी काढत नाहीत, असा आजपर्यंतचा पाहण्यातला अनुभव आहे; परंतु शहादा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजन मोरे यांनी स्वतः १५ ते २० फूट खोल पाण्यात उतरून गोताखोराला सोबत घेऊन एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढत आपले कर्तव्य बजावले. पाण्यातून स्वतः मृतदेह बाहेर काढणारे पहिलेच अधिकारी असल्याचे सांगत सोशल मीडियावरून श्री. मोरे यांचे नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. (Assistant Police Inspector Rajan More of Shahada collect dead body from 20 feet deep water nandurbar news)


हेही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

शहादा पोलिस ठाणे हद्दीतील असलो दूरचित्रअंतर्गत येणाऱ्या जाम (जावदा, ता. शहादा) येथील केटीवेअर बंधाऱ्यात मध्य प्रदेशातील लालसिंग शिवराम चव्हाण (वय अंदाजे ३५, रा. देवधर, ता. पानसेमल, जि. बडवानी) या व्यक्तीने उडी घेतली असता मृतदेहाची शोधमोहीम सुरू होती; परंतु शर्थीचे प्रयत्न करूनही हाती काहीही मिळत नव्हते. त्या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजन मोरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता तेथे १५ ते २० फूट पाण्याची खोली होती.

परिस्थिती पाहून त्यांनी आपल्यासोबत प्रकाशा येथील सीताराम पुंजू भोई यांना बोलावून त्यांच्या सोबत स्वतः पाण्यात उतरून त्या व्यक्तीला बाहेर काढले. सर्व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले. स्वतः पाण्यात उतरून मृतदेह बाहेर काढणारे ते पहिलेच अधिकारी म्हणावे लागेल, अशा प्रतिक्रिया समाजमनात उमटत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Ladki Bahin yojana: बहिणींसाठी ‘ई-केवायसी’ रुसली; ‘कनेक्टिव्हिटी’सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

अरे वाह! 'या' मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरा सुद्धा आहे 'या' मालिकेतील अभिनेता, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

Latest Marathi News Live Update : दादर प्लाझाजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू,चार जखमी

SCROLL FOR NEXT