crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : वडाळी येथे मोठ्या भावाने फोडले लहान्याचे डोके

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून लहान भावास जखमी करणाऱ्या मोठ्या भावाविरुद्ध सारंगखेडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

दुकानाच्या वादातून ही मारहाण झाली.(At Wadali elder brother smashed head of younger one nandurbar crime news )

पोलिसांनी दिलेली माहिती अशी

वडाळी (ता. शहादा) येथील संतोष आत्माराम बैसाणे यांनी आपल्या हिश्शाच्या शॉपिंग सेंटरला कुलूप लावल्याच्या रागाने त्यांचा मोठा भाऊ प्रवीण आत्माराम बैसाणे याने संतोष बैसाणे यास बेदम मारहाण करून रक्तबंबाळ केल्याने गंभीर जखमी झाला.

संतोष बैसाणे सकाळच्या सुमारास आपल्या वर्कशॉपवर काम करत असताना प्रवीण बैसानेसह दोन्ही मुले कबीर बैसाणे, अंकुश बैसाने व वहिनी संगीता बैसाने यांनी दुकानात घुसून कुऱ्हाडीच्या लाकडी दांडक्याने डोक्याला बेदम मारहाण केली.

मारहाणीत जखमी झालेले प्रवीण बैसाणे यांना प्राथमिक आरोग्य केंद्र वडाळी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

त्यानंतर संतोष बैसाने यांच्या फिर्यादीवरून प्रवीण आत्माराम बैसाणे, कबीर प्रवीण बैसाणे, अंकुश प्रवीण बैसाणे व वहिनी संगीता प्रवीण बैसाणे या चौघांविरुद्ध सारंखेडा पोलिस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा तपास हवालदार चुनीलाल धनगर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT