Dignitaries felicitating athletes of Unique Fitness Club who won medals in National Power Lifting Competition.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत धुळ्यातील खेळाडूंची पदकांची कमाई

सकाळ वृत्तसेवा

धुळे : सोनीपत (हरियाना) येथे झालेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत धुळे शहरातील युनिक फिटनेस क्लबच्या चार खेळाडूंनी सुवर्ण व रजतपदकांची कमाई केली.

या खेळाडूंचा रविवारी (ता. २) क्लबतर्फे शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख कैलास मराठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (Athletes win medals at National Powerlifting Championships dhule news)

सोनीपत (हरियाना) येथे नुकतीच राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा झाली. स्पर्धेत शहरातील गल्ली क्रमांक ६ मधील युनिक फिटनेस क्लबचे हृषीकेश जाधव, वरद नेवे, तेजस कोलते, पूनम काळे सहभागी झाले. हृषीकेश जाधव याने डेड लिफ्ट प्रकारात (१४० किलो) तसेच बेंच प्रेसमध्ये (७० किलो) अशी दोन सुवर्णपदके पटकावली.

विशेष म्हणजे हृषीकेश हा दिव्यांग आहे. वरद जितेंद्र नेवे याने डेड लिफ्टमध्ये (१४० किलो) सुवर्ण व बेंच प्रेस प्रकारात (५० किलो) रजतपदक मिळविले. वरद हा १४ वर्षांचा आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

तेजस एकनाथ कोलते याने बेंच प्रेस प्रकारात (९० किलो) सुवर्णपदके, तर पूनम संजय काळे हिने डेड लिफ्ट प्रकारात १२० किलो वजन उचलून सुवर्णपदक व बेंच प्रेसमध्ये ६० किलो वजन उचलून सुवर्णपदक प्राप्त केले.

या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक स्वराज गोयर, भूपेंद्र सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या सत्कारप्रसंगी सागर भडागे, अशोक बडगुजर, नीलेश शर्मा, एकनाथ कोलते, सुवर्णा कोलते, संजय काळे, सुरेश सोनार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांचा त्रास कमी होणार! पाऊस थांबताच काँक्रीटीकरणाला सुरुवात; पालिकेची खड्डेमुक्त शहराकडे वाटचाल

कसोटी ते वन डे कर्णधार! रोहित शर्माला हटवून Shubman Gill ला पुढे आणण्याची Inside Story

DMart Shopping Tips : तुम्ही डिमार्टला जाता अन् बिल तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त येतं का? तर या टीप्स नक्की फॉलो करा

Nashik Kumbh Mela : कुंभमेळा कामे दर्जेदारच हवीत! गुणवत्ता आणि पारदर्शकतेबाबत मुख्यमंत्र्यांच्या सक्त सूचना

Latest Marathi News Live Update: लोणीमधील शेतकरी मेळाव्याला शाहांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT