Property owner while giving check to municipal confiscation team. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : लाखाचा धनादेश दिल्याने ऑटो सर्व्हिसवर जप्ती टळली

शहरातील बड्या मालमत्ता कर थकबाकीधारकांवर आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या आदेशाने जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरातील बड्या मालमत्ता कर थकबाकीधारकांवर आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या आदेशाने जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

त्यानुसार अवधान येथे जप्तीपथक कारवाईसाठी पोचले असता थकबाकीदाराने लाखाचा धनादेश दिल्याने जप्तीची कारवाई टळली. (Auto service avoids confiscation by giving check dhule news)

अवधान येथील मुकेश अग्रवाल यांच्या प्रीती ऑटो सर्व्हिसकडे (वासवा टायर) एक लाख ३३ हजार ६२१ रुपयांची थकबाकी होती. थकबाकी भरण्याबाबत त्यांना वारंवार नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

तसेच १५ दिवसांची मुदत देऊनदेखील त्यांनी भरणा केला नाही. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, कर मूल्य निर्धारण अधिकारी पल्लवी शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली जप्तीपथक कारवाईसाठी घटनास्थळी पोचले.

त्यानंतर श्री. अग्रवाल यांनी एक लाख आठ हजार ५८३ रुपयांचा धनादेश दिल्याने जप्तीची कारवाई स्थगित करण्यात आली.

जप्तीपथकातील वसुली अधीक्षक शिरीष जाधव, निरीक्षक मुकुंद अग्रवाल, मधुकर वडनेरे, गोरख धनगर, सचिन पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! मार्गावर तब्बल ८०० खड्ड्यांच साम्राज्य

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Pune News : पतीला अर्ध यकृत दिल, प्रत्यारोपणनंतर पत्नीसह दोघांचाही मृत्यू; पुण्यातील रुग्णालयात घटनेने खळबळ

दोन महिन्यात उजनीतून सोडले 97 TMC पाणी! उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटाने उघडले; भीमा नदीतील विसर्ग 45 हजार क्युसेक, पंढरीतील पूरस्थिती आज पूर्वपदावर

Mumbai News: पावसाची पुन्हा विश्रांती पण मुंबईकरांना दिलासा, सातही धरणात ९५ टक्के पाणीसाठा; पाहा आकडेवारी

SCROLL FOR NEXT