Pawanputra Vijay Gymnasium Ganeshmandal by young artists enlightening on various topics through live performances. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Ganeshotsav News : पवनपुत्र गणेशमंडळातर्फे सजीव देखाव्यातून प्रबोधन

सकाळ वृत्तसेवा

Dhule Ganeshotsav News : गेल्या ४२ वर्षांची समाजप्रबोधनाची परंपरा कायम ठेवत धुळे शहरातील श्री पवनपुत्र विजय व्यायामशाळा गणेशमंडळाने यंदाही प्रबोधनात्मक देखावा सादर केला आहे.

बेरोजगारी, परिसर स्वच्छता, मतदान जागृती आदी विविध विषयांवर सजीव देखाव्यातून प्रबोधन करण्यात येत आहे. (awareness by Pawan Putra Ganesh Mandal through live performance dhule ganeshotsav news)

पवनपुत्र गणेशमंडळाची स्थापना १९७५ मध्ये झाली. १९८० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते व्यायामशाळेचे उद्‍घाटन झाले. गेल्या ४२ वर्षांपासून मंडळातर्फे प्रबोधनात्मक देखावा सादर करण्यात येत आहे. सोबतच रक्तदान, वृक्षारोपण, स्वच्छता अभियानातही मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रिय असतात. यंदा गणेशमंडळातर्फे आठ फूट उंचीच्या गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.

आकर्षक रोषणाई, सजावट करण्यात आली आहे. मान्यवरांच्या हस्ते श्रीगणरायाची आरती झाली. विलास पवार, अमोल पाटील, अनिल चव्हाण, सुनील पाटील, मनोज गर्दे, नरेंद्र चौधरी, पी. एन. पाटील, संतोष ताडे आदी पत्रकार उपस्थित होते. दरम्यान, मंडळाचा प्रबोधनात्मक सजीव देखावा पाहण्यासाठी धुळेकरांची गर्दी होत आहे.

मंडळाचे अमित पवार, सुमीत पवार, गणेशमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र मराठे, ज्येष्ठ सदस्य रमेश लहामगे, कार्याध्यक्ष सागर शिंदे, उपाध्यक्ष पप्पू सकोरकर, खजिनदार राजू सोनवणे, रघू चौधरी, सुनील चित्ते, गणेश रणमाळे, राजेंद्र हराळ, सचिन जाधव, दर्शन वाघ, मोहन महाराज, सुरेश लहमगे, विलास मगर, शुभम लुटे, पप्पू जाधव, राम कानडे, श्याम कानडे, गोविंदा ठाकरे यांच्यासह युवा कार्यकर्ते कार्यक्रमाचे संयोजन करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: सासवडमध्ये भाजपाचा डबल धमाका; प्रभाग २ आणि ९ पूर्णपणे भगवे

Nagar Palika Result 2025 : उरणमध्ये अज्ञात व्यक्ती स्ट्राँग रुममध्ये घुसला, नाश्ता देण्याच्या बहाण्याने आला अन्... मतमोजणी केंद्रावर राडा

Kolhapur Election Result : कोल्हापूर जिल्ह्यात मतमोजणीला सुरूवात, कागलमध्ये निकालापूर्वी अभिनंदनाचे बॅनर लावल्याने तणाव; उत्कंठा शिगेला

U19 Asia Cup India Pakistan: कुमारांनाही आशिया कप जिंकण्याची संधी; पाकिस्तानविरुद्ध आज अंतिम सामना, भारताचे पारडे जड

Kedarnath Snowfall Video: हर हर महादेव! स्वर्ग जणू पृथ्वीवर उतरला, केदारनाथमधील अद्भूत हिमवृष्टीचा Viral Video

SCROLL FOR NEXT