Bad road esakal
उत्तर महाराष्ट्र

धुळे : तावखेड्याचा काय रस्ता, काय तो चिखल

प्रतीक जोशी

धुळे : एकदा हातात सत्ता आली, की कसली जनता आणि कसले मतदार, बघू या निवडणुकीतच! असा सत्ताधाऱ्यांचा रुबाब असतो. याचे दर्शन शिंदखेडा तालुक्यातील नागरिकांना जाणवू लागले आहे. सत्तांतर झाल्यावर समस्या संपल्या तर नाहीच मात्र त्या अधिकच वाढल्या आहेत. तावखेडा येथे येण्यासाठी वर्शी, दभाषी, सुकवद, निरगुडी असे चार रस्ते पण त्यात एकही रस्ता खड्ड्यांविना नाही. त्यातही निरगुडी रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे.

तावखेडा गावचा काय रस्ता, काय खड्डे, काय तो चिखल असेच म्हणण्याची वेळ आली आहे. कोणत्याही भागात गेल्यास खड्ड्यांचेच रस्ते आहेत. खड्डे बुजविण्याबाबत अनेक वेळा ग्रामस्थांनी केल्या आहेत. मात्र निधीबाबत लोकप्रतिनिधींकडून सबब दिली जात आहे. त्यामुळे निधी कधी मिळणार आणि काम कधी सुरू होणार, या प्रश्‍नातच ग्रामस्थ त्रस्त आहे. नागरिकांना शेतात किंवा बाहेर गावी जाण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्यांचा प्रश्‍न सुटावा आणि ग्रामस्थांना किमान प्रवास करण्याइतपत रस्ता मिळावा अशी मागणी होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT